पेठ जाहिराती

पेठ तर पेठ नाहीतर स्वर्गाची भेट ...!

0

पेठ आणि मी  | Peth And Me

तसा जन्म माझा हरसूल चा पण वडिलांच्या बदलीमुळे आमचे कुटुंब पेठ तालुक्यात आलो त्यावेळी हरसूल हे देखील पेठचाच  भाग होते.त्यामुळे जन्म जरी हरसुलाचा असला तरी माझे बालपण आणि तरून पण हे पेठ तालुक्यात जात आहे.म्हणजे अजून मी पेठ तालुक्यातच आहे कदचीत इथेच म्हातारा होणार आणि इथेच मरणार पण एक मात्र नक्की या पेठ्ने खूप काही शिकवले.आणि  खुपकाही दाखवले म्हणून कुठेही गेलो तरी पेठ मात्र मनात असतोच आणि असणारच कारण इथेच तर माझ्या आठवणी आहेत.  पेठ तर पेठ नाहीतर स्वर्गाची भेट …! 

पेठ तर पेठ नाहीतर स्वर्गाची भेट ...! 

पेठ विषयी थोडक्यात | Short Information on Peth

नाशिक जिल्हातील एक आदिवासी तालुका म्हणजे पेठ ;तसा पेठ फारमोठा नाही जिथे आपल्याला काहीच माहिती नसल्यास आपण हरून जाल किंवा आपल्याला गुगल म्याप वापरण्याची गरज पडेल छोटास आहे माझ पेठ .नाशिक जिल्ह्यातील सर्वाधिक पावसाची नोंद माझ्या तालुक्यात असते.म्हणून भात पिक पेठ मध्ये मोठ्या प्रमाणात घेतले जाते.पेठ मध्ये एकूण ७२ ग्रामपंचायती असून २०११ च्या जनगणने नुसार १०००२८ इतकी लोकसंख्या आपल्या पेठ मध्ये उपलब्ध होती.पण आता १३ वर्षामध्ये कदाचित हि लोकसंख्या दुप्पट झाली असावी असे आपण समजू.
तसे पेठ तालुक्यात जास्त काही प्रेक्षणीय स्थळे नाहीत पण जे हि उपलब्ध आहे ते एकदम उत्तम प्रकारे निसर्गाने नटलेले आहे.

पेठ मधील जाती धर्म | Cast And Religion in Peth

पेठ तालुक्यात आज पर्यंत मी २७ वर्षाचा होई पर्यंत जाती धर्मावरून कुणाच भांडण तंटा झालेला आहे.असे ऐकायला मिळाले नाही.आणि कोणत्याच जातीचा किंवा धर्माचा एकमेकांना त्रास होतोय किंवा झाला असे कधी पहिले नाही कि ऐकले नाही.

पेठ मध्ये  हिंदू ,मुस्लीम ,सिख ,इसाई ,ख्रिचन ,आदिवासी ,बहुजन समाज अशा सर्व धर्मांचे व जातीचे लोक एकत्र राहतात आणि विशेष म्हणजे सर्वान मध्ये एक अतूट विश्वास देखील आहे. तुम्हाला सांगायचे झाले तर मी स्वतः आदिवासी माझा मित्र पांडभांडण झाले नाही व ,आणि एक अमित पठाडे ,त्यात रझाक ,आदिल मणियार ,मयूर राहणे ,घनशाम चौधरी ,विक्रम ,निलेश इमपाळ ,सुयश ठाकूर ,सनी महामाने ,इत्यादी सर्वांची नावे घेत बसलो तर वेबसाईट लोड खायला लागायची असो सांगायचं होत अस कि हे माझे मित्र आमच्यात भांडण झाली पण कधी जातीवरून किंवा धर्मावरून भांडण झाले नाही किंवा आम्ही कधी एकमेकांना हिणवल नाही आज ते जेव्हा या वेबसाईट वर येवून हे वाचतील तेव्हा ते देखील माझ्या या लिखाणाला योग्य आणि बरोबर बोलतील.

पेठची जत्रा | 

होळी आली कि जत्रा येणार आणि मग १० दिवस मोठी  मजा काय ते पाळणे ? काय ती लायटिंग ? सगळ कस ओके मध्ये ! होळी येणार म्हणून २ महिने आधी कामावर गेलेला आदिवासी समाज परत यायला सुरु होते होळीचा मुहूर्त मनात ठेवून नवीन गाड्या ,नवीन घर ,नवीन सोने नाणे किंवा महागडी वस्तू घेण्यासाठी सुरु होते.हळू हळू मंदावलेली पेठ्ची बाजारपेठ बहरायला व धंदा वाढायला  सुरवात होते. कारण कामावर गेलेले लोक आता परतीच्या प्रवासाला लागतात कारण होळीचा सन हा पेठमधील एक महत्वाचा सन मानला जातो.२० मार्च २०२०  लॉकडाऊन जाहीर होण्याआधी पेठ्ची यात्रा भरली होती सर्वत्र यात्रा बंदी असताना आम्ही मात्र गर्दीत यात्रेत होतो.कारण हा सन आणि हि यात्रा वर्षातून एकदा येते  त्यामुळे व्यवस्तीत मजा करायला नको तिकडे चीन मध्ये करोनाचा उद्रेक झाला होता आणि तो करोना सोबत झुंजत असताना आम्ही मात्र यात्रेत मजा करत होतो .यावरून तुम्हाला लक्षात आले असेल कि   यावरून तुमच्या लक्षात आले असेल कि पेठ्ची यात्रा किती महत्वाची आहे. लक्षात घ्या २२ मार्च २०२० ला लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता.

पेठ मधील देवस्थाने 

पेठमधील देवस्थाने याविषयी लिहायचं झाल तर मी काय जास्त फिरलो नाही पण सप्तशृंगी मंदिर ,शंकराचे तळ्याच्या बांधावर असलेले मंदिर ,शनी देवाचे मंदिर ,तोंडवळ चे खंडेराव महाराज मंदिर तसेच महाशिवरात्रीसाठी फेमस असलेले  दरीतले महादेवाचे मंदिर 

पेठ मधील प्रमुख  व्यवसायिक 

पेठ मधील प्रमुख व्याव्सायीकानाविषयी बोलायचे झाले तर महामाने हार्डवेअर , महामने मेडिकल ,ठाकूर भांड्यावले ,बाबा ठाकूर हार्डवेअर,आझाद मोबाईल शॉपी ,कस्तुरे अमूल दुध  विक्रेते , मोहना गार्डन , इत्यादी बऱ्याच नावांचा समावेश होऊ शकतो सर्व व्यवसायिक एका ला एक वरचढ आहेत.

पेठ तालुक्यातील शैषणिक संस्था 

पेठ तालुकात जिल्हा परिषदेच्या दोन शाळा आहेत 

१.जिल्हा परिषद शाळा नं १ - १ ली ते ४ थी 

२ .जिल्हा परिषद शाळा नं २ - १ ली ते ४ थी 

३.मराठा विद्याप्रसारक संथेची शाळा - ५ ते १२ वी 

४.जनता विद्यालय पेठ व कनिष्ठ महाविद्यालय पेठ -५ ते १२ (आर्ट्स कॉमर्स व सायन्स ) 

५.सरकारी औद्योगिक प्रशिक्षण संस्था पेठ (ITI) 

६.महंत जमनादास महाराज कॉलेज करंजाळी 

७.के.बी.एच विद्यालय करंजाळी 

८.आश्रम शाळा (कोहोर,असर्बारी,चोळमुख,इनामबारी इत्यादी )

९.APJ कॉम्पुटर्स (CCC,BCC, Website design, Mobile App Design, Cartoon Animation, Digital Marketing, Google SEO, Tally   इत्यादी टेक्निकल कोर्स व डिप्लोमा उपलब्ध केंद्र शासन मान्यता प्राप्त )

१०.आदर्श कॉम्पुटर्स  (पेठ/करंजाळी ) (MSCIT/AUTO CAD /Typing /Tally इत्यादी  कोर्स उपलब्ध राज्य शासन मान्यता प्राप्त )

११.Expert typing Institute करंजाळी 

१२.डांग सेवा मंडळ सिनियर कॉलेज पेठ 

इत्यादी छोट्या मोठ्या खूप शाळा उपलब्ध आहेत 




पेठ (Peth | नवीन Peint), माझ्या हृदयात नेहमीच एक विशेष स्थान असणारे ठिकाण

माझा जन्म आणि संगोपन महाराष्ट्राच्या मध्यभागी असलेल्या पेठ (Peth | Peint) नावाच्या छोट्या शहरात झाले. पेठेत वाढणे हा एक अनोखा अनुभव होता जो मला नेहमीच आवडेल. माझ्या हृदयात हे स्थान एक विशेष स्थान आहे कारण तेच मला जीवनातील मौल्यवान धडे शिकायला मिळाले ज्याने मला आज मी जो माणूस आहे त्यामध्ये आकार दिला आहे.

पेठ (Peth | Peint) हा एक विलक्षण परिसर होता, जो दोलायमान आणि रंगीबेरंगी लोकांनी भरलेला होता, जे मदतीचा हात देण्यासाठी नेहमीच उत्सुक होते. मला गजबजलेले रस्ते आठवते, ज्यात विक्रेते ताजे उत्पादन विकतात आणि स्त्रिया चांगल्या किमतीत सौदेबाजी करतात. ही अशी जागा होती जिथे प्रत्येकजण इतर सर्वांना ओळखत होता आणि अगदी अनोळखी लोकांचेही मोकळेपणाने स्वागत होते.

पेठेतील माझ्या आठवणींपैकी एक म्हणजे पावसाळा. पावसाने शहराला झोडपून काढले आणि रस्त्यांवर पूर येईल, लहान-नद्यांमध्ये रुपांतर होईल. मात्र या काळातही पेठेतील लोक एकमेकांच्या मदतीसाठी एकत्र येत असत. 

पण जसजसा मी मोठा झालो तसतशी परिस्थिती बदलू लागली. इतर अनेक शहरांप्रमाणे पेठचेही अधिक व्यापारीकरण होत होते. एकेकाळी शहराचे हृदय असलेल्या छोट्या दुकानांची आणि व्यवसायांची जागा हळूहळू मोठ्या मॉल आणि सुपरमार्केटने घेतली. रस्त्यांवर आता लोकांची गर्दी नव्हती आणि एकेकाळी अस्तित्वात असलेली समाजाची भावना हळूहळू नष्ट होत होती.

अभ्यास आणि करिअर करण्यासाठी मी पेठ (Peth | Peint) सोडले तेव्हा मला त्या ठिकाणाची किती उणीव जाणवली. जेव्हाही मी भेट देत असे तेव्हा मला माझ्यावर नॉस्टॅल्जियाची जाणीव होते. मी त्या दिवसांची आतुरतेने वाट पाहत होतो जेव्हा जीवन साधे आणि गुंतागुतीचे नव्हते, जेव्हा लोक खरे आणि दयाळू होते.

पेठ (Peth | Peint)वर्षानुवर्षे बदलली असेल, पण त्यातून मला शिकवलेल्या आठवणी आणि धडे कायम माझ्यासोबत राहतील. यातून मला समाजाचे महत्त्व, गरजेच्या वेळी एकत्र येण्याचे आणि जीवनातील साध्या साध्या गोष्टींची कदर करायला शिकवले. जरी मी शारीरिकदृष्ट्या पेठ सोडली असली तरी ती माझ्या हृदयात नेहमीच एक विशेष स्थान ठेवेल.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top