पेठ जाहिराती

पेठ तालुक्यातील सावळघाटातील भयाण वास्तव्य - एक सत्य कथा

1

 

पेठ तालुक्यातील सावळघातील भयाण वास्तव्य - एक सत्य कथा

नमस्कार मित्रानो मी आपल्याला पेठ तालुक्यातील सावळघातील भयाण वास्तव्य - एक सत्य कथा आज आपल्याला या लेखाच्या माध्यमातून सांगणार आहे.

ह्या कथा संपूर्ण पणे खरी असून मी आपणाला पत्राची ओळख लपवत या कथेचे पात्र मीच आहे.असे सांगणार आहे त्यामुळे सर्वांनी हा प्रसंग माझ्या बाबतीत घडला आहे असे समजू नये.

हा प्रसंग हि घटना ज्याच्या सोबत घडली त्याच्या तोंडून मी स्वतः ऐकली आणि तीच या लेखात उतरवण्याचा प्रयत्न केला आहे तरी सर्वांनी हि कथा शेवट पर्यत वाचावी व काय आहे सावळघाटातील

भयाण वास्तव्य हे जाणून घ्यावे जेणे करून आपल्या सोबत अशी आप बीती होणार नाही.तसेच मी एक आपल्याला आधीच सांगून टाकतो कि माझा भूतचेतावर विश्वास नाही पण त्याची आपबिती ऐकून मला सुधा

विश्वास बसण्यास थोडा विचार करावा लागेल. आपबिती ला सुरवात करतो,

पेठ तालुक्यातील सावळघातील भयाण वास्तव्य - एक सत्य कथा 



पेठ तालुक्यातील सावळघातील भयाण वास्तव्य - एक सत्य कथा

 

जानेवारी महिना आला कि लग्नाच्या चाहुली लागायला सुरवात होते आणि हळू हळू आपल्या आवडत असलेल्या पोरींच्या पत्रिका हातात पडायला सुरवात होते.

अशीच एक पत्रिका मला हातात पडली आणि मी चक्क झालो शेवटी

हिला भेटला ...एकदाचा थोडी नात्यातली असल्याने जाने गरजेचे होते ...हा आता तुम्ही म्हणाल कि तीच माझ काही होत अस काही नाही.... जिच्या सोबत माझ होत ...

तिची ती खास मैत्रीण होती आणि आम्हाला लग्ना आधी खूप सपोर्ट तिने केला होता..

पण बिचारी थोडी काळ-सावळी असल्याने तिला नवरा मिळत नव्हता ...हरकत नाही..... देर  आई दुरुस्त आई ...

शेवटी तिचा जोडीदार तिला मिळाला ...लग्न फेब्रुवारी मध्ये असल्याने गुलाबी थंडी असणार मला माहिती होते आणि पेठ तालुक्यात जसा जोरदार पाऊस पडतो तसाच जोरदार हिवाळा देखील असतो.

अशा कडक थंडीच्या वेळी लग्नात वरातीत दारू पिऊन नाचण्याचा आणि घाम काढण्याचा आनंद काही वेगळाच असतो...लग्नाची तारीख किती आहे अस बघायला गेलो आणि लक्षात आल आपण लग्नाला नाही जाऊ शकणार

कारण मला माझ्या कंपनी कडून सुट्टी मिळणार नाही म्हणजे झाल अस कि त्या दिवशी कंपनीच ऑडीट असल्याने म्हणजे आयकर विभागाची चौकशी असल्याने प्रत्येक कंपनीतील कामगारास हजर राहण्यास सांगण्यात आले होते.

असे बोलल्यावर  बायकोने एकदाचे दुधाचे पातीले  खाली आपटले आणि रागात माझ्याकडे पहिले.

 

मी केले तिला आणि तिने केला कहर !

अरे मनोहर राव आता कसाही करून तू स्वतःला सावर !

 

असाच हो ! नाही हो ! नाही करता करता शेवटी सर्व हाळदिला जाऊन दुसऱ्या दिवशी असणाऱ्या ऑडीट साठी मी परत नोकरीच्या ठिकाणी लग्नाला न थांबता निघून येईल असे ठरले.

लग्नाच्या नाडी नाडी गावी जायला मिळेल या खुशीत बायको ब्यागा भरत होती.ब्यागा भरून झाल्यावर आम्ही निघालो आणि गावी पोचलो

एक दिवस इकडे तिकडे फिरण्यात गेला दुसऱ्या दिवशी तिच्या लग्नाला आमचे सर्व मित्र परिवार आला होता.

हळद लागली आणि तेलवण गळाल तसा प्रत्येक जन एकमेकांना खुणावून लोकेशन पाहू लागला मिळेल त्या वाटेला आणि मिळेल त्या वावरत जाऊन पंगती बसू लागल्या

गावातील दुभत्या घराची म्हैस असल्याने ....मोहाची दारू वैगेरे मोठ मोठाले टीप भरून होती.

 

नाचायला नाच यावा म्हणून थोडी घ्यावी !

बायकोच्या ज्याचाला कंटाळून थोडी तरी प्यावी !

 

म्हणून फक्त मी माझ्या मित्रांसोबत गेलो आणि घोट घोट प्यायलो ...काय सांगू तुम्हाला ! साला मला न घोट भर पण लई होते.

तसा मी टून होईन गेलो..... रात्री ९ वाजता नाचायला गेलो ...जशी ढगाला लागली कळ.....!

चालू झाला आणि बस मित्रोनो फक्त धुरळा नाचायला सुरवात केली आणि नाचता नाचता कधी ९-१० आणि १० -१२ वाजले कळल नाही.

मी नाचतच होतो पण नाचता नाचता एक लहान मुलगी माझ्या जवळ आली आणि म्हणाली  ....

बाईनी बलवलाय ....! तशी माझी अर्धी उतरली आणि मला लक्षात आल कि मला १२:३० ची

वापी बस आहे. आणि मी लगेच सर्वांचा निरोप घेऊन निघालो.तशी माझी दारू पूर्ण उतरली नव्हती पण मी तोंड धुवून पावडर लाऊन आणि विमल खाऊन जरा न पिणाऱ्या सारखा दिसत होतो.

सगळ्यांचा निरोप घेऊन मी माझ्या साल्या सोबतसावळघाटचा नाकेआंबा  बस  थांब्यावर जाण्यसाठी निघालो त्याने मला गाडीवर आणून सोडला ...आणि त्याला नाचायची फार हौस असल्याने त्याने लगेच तिथून कल्टी मारली आता काय सांगू नेमका माझ्याकडे  ब्याटरी सुधा नवती भल हो त्या चंद्रच कि तो तरी उजेड पाडत होता. वापी बस यायला १० मिनिटे बाकी होती. या १० मिनिटात काय जादू झाली कुणास ठाऊक पण बरोबर १२:३० ला चंद्र समोर ढग जमा झाले आणि अचानक खूप अंधार पसरला तसा मी घाबरट नाहीये वरती पहिले ते चंद्र समोर खुपसारे ढग येवून राहिले होते.मला वाटल जातील इतक्यात  म्हणून मी काय जवळच असलेल्या गवळ्यांच्या झापावर गेलो नाही आणि घाबरलो नाही...इतक्यात वापी बस जोरात आली तसा मी पटकन तिला हात द्यायला पुढे सरसावलो काहीही करून कंपनीत पोचणे महत्वाचे असल्याने जावे लागणारच होते म्हणून पटकन हात वरती केला पण ह्या गुजरात वाल्या बस थांबतील तर न ...नाही थांबली आता काय करयचे असा प्रश्न उद्भवला दोनतीन ट्रकाना हात देऊन पहिला काही केला कोणी थाबेना त्यात जसा काळोख पडला तसा पडलेला होता चंद्र समोरचे ढग पण हलायला तयार नाही.

अंधारात मी एकटाच नाकेआंबा येथे उभा होतो आणि कोणी गाडी येतेय का याची वाट पाहत होतो १ वाजला आणि गाड्या येणे बंद झाल्या काय करावे सुचेना तरी पण म्हटलं थांबव आणि आलीच एखादी तर हात द्यावा म्हणून तिथेच उभा होतो.रात किड्यांचा तो कीर किर्र किर्र आवाज कानावर पडत होता जोरात चालणारी हवा मला स्पर्श करुन जात होती.आणि मी थंडीने हूड हूड करत होतो .त्यात मध्ये मध्ये मांगोने गावाकडून कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज कानावर येत होता या आवाजान पलीकडे सुसाट शांतता  पसरली होती परत जावे तर किमान २ किमी चालायला लागेल .हा विचार करतच होतो इतक्यात एखादी गाडी गामा जिबगाडी येत आहे असे जाणवले पण गाडीच्या लाईटी काही चालु नवत्या.मी  केला आणि मनातच विचार करत राहिलो कि बाबा तू तरी थांब !!! त्याने मला पाहिलं.... कि नाही ....माहित नाही....पण गाडी आली माझ्या समोर थांबली आणि खटकन दरवाजा उघडला आणि कोणीतरी ड्राईवर शीटचा इथून खाली उतरले. आणि दरवाजा खटकन लागला.

परत एका मिनिटाने ड्राईवर शीटचा दरवाजा उघडला आणि परत आधी पेक्षा जोरात बंद झाला मला वाटल ड्राईवर लघवी करून परत आला ....आणि गाडी चालू झाली आणि हळू हळू चालू लागली खूप वेळ झाला गाडी  चालत होती ...पण गाडीचा आवाज जरासुद्धा येत नव्हता ...आता या आधी मी अशी गाडी कधीच पहिली नव्हती कि जरा सुधा आवाज येत  नाही ...न राहवून मी विचारल तुमची गाडी लय भारी आहे हो ! जरा सुधा आवाज करत नाही ... तसा मागच्या शीटन कडून ह्म्म्म....!!!! असा आवाज मला ऐकयला आला ...मी म्हणालो बर झाल गाडी हळूच चालवत आहात ...कस रात्रीची वेळ आहे एकतर तुमचा हेड लाईट सुधा काम करत नाही ....त्यामुळे आपला आपला हळूच बर ...मला सुधा घाई नाही आरामात घ्या .....तसा पुन्हा मागून आवाज आला ह्म्म्म .....! ह्या बोलण्यात गाडी करंजाळी च्या पुढे निघाली मागून आवाज येतोय पण ड्राईवर काही बोलत नाही म्हणून मी ड्राईवर कडे तोंड वळवल आणि माझ्या अंगावर काटाच आला?

एकवेळ पण शांतच झालो आणि हळूच मागे वळून पाहिलं गाडीत

तो जो हम्म.....!!!!!!! आवाज होता तो देणारा माणूस तरी दिसेल या आशेने मागे पहिले पण गाडीत कोणीही दिसत नव्हते

गाडी अपोआप चालत होती तिचा स्पीड देखील  वाढत नव्हता काय करावे काही सुचेना

गाडी तून उडी मारावी असा विचार केला पण हे काय आहे ? कोणत्या प्रकारचे भूत आहे...

मला सोडेल का कि लगेच उडी मारून मला खल्लास करेल सांगता येणार नाही..

मनातल्या मनात हनुमान चाळीसा बोलण्यास सुरवात केली गाडी चालतच होती ....

रस्ता सरळ असल्याने स्टेरिंग अपोआप चाकाच्या हालचाली वरती हालत होती ....

मी मात्र समजून चुकलो होतो कि आता आपला काही खर नाही ....

आता आपल्याला अवघड भूतानी झपाटल आहे अस मी मनात आणून मोठ्या मोठ्याने राम राम राम राम ......

जप सुरु केला आणि ड्राईवर कडे लक्ष देन बंद केल माझ काही खर नाही ....

त्या त्या प्रत्येक ठिकाणी मी घाबरून जात होतो ज्या ठिकाणा विषयी खूप वाईट गोष्टी ऐकल्या होत्या ...

अखेर कोटबी गाव आले आणि पेठ कोतंबी घाटा ला सुरवात होणार इतक्यात माझे लक्ष ड्राईवर शीट कडे गेले कळोख्यातून एक काळा काळा हात आत आला तसा मी घाबरलो आणि जोरा जोरात राम राम राम राम असा जप सुरु केला....

पण त्या हाताने मला काही न करता पाहिलं टन साठी गाडी वळवली मी मात्र घाबरून गेलो होतो कोणत्या क्षणी माझ्यसोबत काय होईल याची मला कुठलीच ग्यरांटी राहिली नवती...

आता प्रत्येक टर्न ला अदृश हात येत होता आणि गाडीची स्टेरिंग बरोबर दिशेला वळवून निघून जात होता एकदा दोनदा नेमका काय आहे ते पाहण्याचा प्रयत्न केला पण अंधारामुळे तो हात दिसत होता प बाकी सगळ अदृश राहत होत होत काय करावे सुचेना ....

सगळे देव आणि त्यांचे स्त्रोत्र म्हणून झाले होते पिलेली दारू देखील सगळी उतरली होती.विचार केला आता गाडीतून उतरून पळून जावू मागे वळून अजिबात पहायचे नाही ....

असा प्रयत्न केला मी केला पण पुन्हा भितीवाटली जरा का एकदाच उडी मारली यांनी माझ्या अंगावर ....एकतर दिसत सुधा नाही काय आहे....

अशे एक एक टर्न पार करत गाडी कोतंबी घाट चडत चाली होती...

टर्न आला कि हात यायचा स्टेरिंग फिरवायचा आणि निघून जायचा त्यात ....

गाडीवाल्या भूतानी माझ्या गोष्टीला एवढ सिरीयस घेतल कि गाडीचा स्पीड  १० पेक्षा जास्त वाढत नव्हता ...

हनुमान चालीसा आणि रामजप करता करता अचानक समोर मला माझ्या आशेचा किरण आणि सुटकेची अशा दिसली कदाचित आपण वाचू असा वाटायला लागला आता बस एक टर्न आणि शनिदेवाचे मंदिर आले ....शनिदेवाच्या मंदिरा समोर ३ लोक धुनी करून शेकत बसले होते ...सकाळचे ५:३० वाजले होते.इतक्या हळू स्पीडने गाडी भूत चालवत होते ....मी आता वाचणार असा विचार करत जोरजोरात राम राम राम राम ....असा जप चालू केला आणि तो क्षण आला ....गाडी शनिदेवाच्या मदिरा समोर आली आणि मी माझ्या बँग सोबत ....खाट कण गाडीचा दरवाजा उघडला आणि पळायला लागलो ....रस्त्या पासूनचे ते अंतर आहे फार कमी आज कुणास ठाऊक का ...पण त्या भुताच्या माये पुढे मला लांब लांब वाटत होते कसा बसा मी त्या धुनी करून बसलेल्या माणसांच्या जवळ पोचलो आणि सुटकेचा निश्वास सोडला तोच ....

धुनी वरती बसलेली माणसे ज्याची तोंड खाली होती आणि मी नीट पाहिलेली सुधा नव्हती ती सर्व जोर जोरात हसायला लागली...आणि मी आणखीन घाबरलो आगीतून फोफाट्यात पडल्यासारखं वाटला ....अचानक मागे वळून पहायची हिम्मत झाली नाही पण तिकडे कान टवकारले कोणीतरी चालत आपल्या दिशेने येत  आहे ...असा आवाज आणि भास होत होता....?

आणि तो आवाज जवळ जवळ येत होता. अचानक तो पाउलांचा आवाज खूप जवळ आला माझ्या अंगावर काटे आले आणि त्याने माझ्या खांद्यावर जोरात हात मारला तसा मी जोरात ओरडायला लागलो वाचवा........!!!!!!!!  वाचवा......!!!!! कोणीतरी मला वाचवा हा मला आता खाऊन टाकेल ...!!!

तशे ते तिन्ही  धुनी वर बसलेले माणसे माझ्याकडे पाहून अधिक विकृप्तेने हसायला लागले ....!!!

माझे ओरडणे थांबेना

तसा आवाज आला ....भाड्या गप .....!!!!!

सावळघाट पासून पहातुय तुला इचारला नाय....!!!  पुसारला नाय....!!!! गाडीत येवून बसला

वरून सांगतो गाडीचा आवाज नाय येत ....भारी गाडी हाये ....सावळघाट पासून लोटत आणली मी

एखादा त उतरून लोटून लागता !!!!

हा भाड्या आयटीत बसलाय !

मालक ज !!!!

वरून जोरजोरात भजना अन देवाची गाणी हनुमान चालीसा आणि नुसता राम राम जप चालू करेल ....

होडी पियाचीच नाय न !!!!

बंद पडेल गाडी समज नाय !! त येल 

आणि मला जाम  लाज वाटली  मी पकडून ५ हि जन माझ्या

कल्पना शक्तीला आणि भीतीला जाम  हसत राहिलो .....

असे भूत तुम्हाला पण झपाटू नये असे वाटत असेल ....

इतर बायकोचा पदर धरून राहा नायतर तीच ऐकूच नका ....हे ...दोन्ही जमत नसेल .....

तर एडपटनो  जास्त पीत   जाऊ नका !

हि एक सत्य घटना व सत्य फजिती आहे....हा किस्सा कसा वाटला तालुका पेठच्या वेबसाईट ला कळवा !!!!

अशाच खऱ्या गोष्टी  वाचण्यासाठी  वेबसाईट वर येत राहा..... 

आपला पेठ तुमचा पेठ सर्वांचा पेठ   




आमच्या टेलिग्रामला जोडले जा ! खालील टेलिग्राम नावावर टिक करा 



खालील  कथा  देखील आपल्याला नक्की आवडेल  एकदा नक्की वाचा 

Post a Comment

1 Comments
Post a Comment
To Top