पेठ जाहिराती

पेठ तालुक्यात घडले असेही बुवा आला दोरीला बांधले घेऊन गेला हजार रुपये....!!!

0

नमस्कार मित्रानो ...!

पेठ तालुक्यात घडले असेही बुवा आला दोरीला बांधले घेऊन गेला हजार रुपये....!!!
तालुका पेठच्या या नवीन स्टोरी मी आपल्याला घेऊन  एका नवीन घटनेत जात आहे. जी ऐकताना मला जेवढ आश्चर्य वाटत होत. तेवढाच त्या व्यक्तीला त्यावेळी जगताना वाटत असेल आणि वेदना होत असतील. हि कथा सत्य घटनेवर आधारित जरी असली तरी या कथेच्या पात्रांचा खऱ्या आयुष्यातील माणसांशी काही एक समंध नाही हे लक्षात घ्या....तसेच कथेत काही अपशब्द वापरणे महत्वाचे असल्याने ते वापरले आहेत तसेच ते जशेच्या तशे गावठी भाषेतून घेतलेले आहेत...

टीप :- प्रत्येक कथेच्या शेवटी आणि प्रत्येक कथेच्या आधी मी आपल्याला कथा काल्पनिक आहे कि  सत्य घटना आहे हे सांगणार आहे.

आजची कथा हि १००% खरी आहे. आजच्या गोष्टीचे शीर्षात


पेठ तालुक्यात घडले असेही बुवा आला दोरीला बांधले घेऊन गेला हजार रुपये !!!

जवळपास १९८६ च्या दरम्यानची हि सत्य घटना सकाळ झाली कोंबडा आरवला दिवसाची सुरवात ..... वासुदेवक आला वासुदेव आला या गाणे सगळीकडे ऐकायला मिळायला लागला साधारण मार्च चा महिना .... कोणाची आंघ चालू होती कुणाची ... तर कोणी पाणी तापवत होते .... कोणी घरासमोरील अंगण सर्वात होते. अशातच गोपळ बाबच एक घर घरात चार मानस बायको ,मुलगा ,सून आणि आबा....

नेहमी प्रमाणे च्या ठोक्याला आबांचा डोळा उघडला आणि आबांनी मिश्री हातावर  घेतली  पडसा  कडे जाण्यास निघाले... दात घासत आबा  पडसा च्या  दिशेने चालत चाले होते. आणि नेहमीच्या ठिकाणी येऊन.आबा थांबले  आणि हळूच आपले धोतर सोडत एक पाय दगडावर तर दुसरा पाय दुसऱ्या दगडावर ठेवून  आबांनी पहिला आवाज काढला ..... !!!!

तुर्रर्रर्रर्र तुर्रर्रर्र पिऊऊऊऊउ पुईईईई .... हे आवाज काढत बाबाचा  कार्यक्रम चालू होता. ...

 सारखे हे आवाज येन चालूच होते .

कधी  तुर्रर्रर्रर्र तुर्रर्रर्र पिऊऊऊऊउ पुईईई

कधी पुईईई पिऊऊऊऊउ तुर्रर्रर्र

असले आवाज निघत असताना त्याना जे सुख मिळत होते ते त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते .....

 

(एक मिनिट स्टॉप घ्या…!!!! लगेच गोष्टीत घूसू नका मी काय त्यांचे एक्सप्रेशन पाहायला गेलो नव्हतो…!!!  हे फक्त एक आपला गोष्टीला माल मसाला आणि गोस्ट चालू केल्या केल्या डायरेक्ट् हागायला घेऊन गेलो का ? ते पुढे कळेल नीट वाचा आणि समजून घ्या ... ! )

तशी गोष्ट साधी आहे .. आणि मानलं तर  खूप आवडघडही .... तर असा भयानक आवाज  हिरोशिमा नागासाकी चालू असताना कोणतेच रानातले पाखरू तिथे थांबत नसेल असं मला वाटत. अशातच कहाणी मी ट्विस्ट देत एक  शेटोल (सरडा) कुठून आला कुणास ठाऊक ... बहुधा त्या शेटल्याला या आवाजांची मज्जा वाटली असावी म्हणून.... पण हा तो आला तर आला ... आबा ज्या पोजिशन मध्ये बसले होते त्या पोजिशन कडे जोरात  आला आणि आबांच्या  दोन पायाच्या मध्ये घुसला तसा..... !!!! अचानक आबांचा पार्षव भाग (गावठी भाषेत भुंडं / गांड ) दुखायला लागली  शेटल्या माझ्या भुंड्यात शिरला !!!! तशे आबा नी निवांत चालणारी संडास पटकन आटोपली आणि कावरे बावरे होऊन घराकडे जोर जोरात पावले टाकत आले. घरात आल्यावर त्यांनी आधी तोंड  हातपाय धूंतले आणि आपल्या बायको कुसुमा जवळ जात... तिला सांगायला सुरवात केली.

त्यांची सर्व  कहाणी ऐकल्यावर आपल्या नवऱ्याला  काहीतरी  दुखने म्हणजे बाहेरच झालं आहे. असा विचार करत दोघे पण घरात बसून राहीले..   आज दिवस भर काहीच शिजवला नसल्याने दोघेही भुक्या पोटी विचार करत चिन्ह बिन्ह होऊन शांत बसले होते. सकाळीच गहू कापण्याच्या उक्त्याला गेलेला मुलगा आणि सून ६ वाजेच्या सांजच्या सुट्टीला घरी आल्यावर... दोघांना शांत पाहून नेहमी प्रमाणे यांचं दोघांचं भांडण झालं असावा म्हणून आज शांतता आहे.  असं सून-मुलाला वाटलं म्हणून त्यांनी कुठलाच प्रकारची विचारपूस केली नाही आणि सुनेने संध्याकाळचा स्वयंपाक बनवायला घेतला आबांच्या  घरात एकत्र जेवणाची पद्धत असल्याने जेवण तयार  झाल्यावर दोघांनाही जेवणासाठी बोलवण्यात आले.

सर्वाना ताटे वाढण्यात आली पिठलं भात रांधलेला असल्याने आबांच्या आवडीचं जेवण होत....तसा आबांचे वय ५२ जेमतेम पण शरीर यष्टी मात्र पहिलवानाला लाजवेल अशी होती. सर्वांन समोर प्रत्येकाचे ताट आले...  सून मूल खूप थकल्याने आणि भुकेले असल्याने त्यांनी जेवायला सूरवात केली दोन तीन घास खाऊन झाल्यावर त्यांच्या लक्षात आले कि आई आणि दादा जेवण करत नाहीये ... तसा मुलाने आपल्या हातातली भाकर खाली ठेवली...

आईला कडे पाहत .....  विचारले

आई कहा व ! काय झालाय ..... !

तशे आईच्या डोळ्यातून असावे ताटात पडायला लागली काहीतरी  सिरीयस मॅटर आहे ...

हे लक्षात आल्यावर दोघांनी  जेवण बाजूला ठेवत तिला काय झाले हे विचारले 

सकाळे  दादा चेस भुंड्यात...!!!!  एक शेटल्या समोरून आला आणि शिरला गोष्ट जरा हसण्यासारखी होती.

पन ज्या प्रमाणे आई हुंदका देऊन रडत होती त्या वरून हसू कोणालाही येत नव्हते आई पुढे  बोललेली तठुन  दादाचास पक्का पोट

दुखतंय तेल काय करावा ह्याच समजत नाय !

खरं तर विश्वास ठेवणे म्हणजे फार अवघड होते.

पण वडिलांच्या पोटात खूप दुखतंय असं समजल्यावर त्यांच्यावर

काहीतरी इलाज केला पाहिजे असे असं विचार करत मुलाने आईला धीर

दिला व उद्याच आपण डोंगऱ्या बाबाकडे जाऊन दान पाहून येऊ  आणि काय असेल उग मरोग त्यो .... करून टाकू

एखादे भूतळील कोंबडा बिम्बाडा लागत होवा.!!!!!!!!

देऊन टाकू आणि आपल्या दादाचा जीव वाचवू असं बोल

मुलाच्या तोंडातून निघाल्यावर आई आणि आबांनी जेवायला सुरवात केली.

 तरी त्यांनी चिंतेत असल्यामुळे नीट जेवण केले नाही.

सकाळी सकाळी दोघे बाप-लेक लवकरच आवरून निघाले....

डोंगऱ्या बाबाकडे जात असताना जाणका बाई रस्तात त्यांना भेटली...

आता जाणका बाई म्हणजे .... आखा गाव तिला घाबरायचं .... कारण

या गावात जशी लग्न करून ती आली तशी ४ वर्षात किरकोळश्या कारणाने तिचा नवरा मेला होता

आणि तिनेच आपल्या नवऱ्याला खाले असा शिका तिच्या ... सासूने तिच्यावर मारला होता... या चार वर्षाच्या संसारात जानका बाईल

२ मुले व एक मुलगी अशी तीन पोर झाली होती....

पण नवऱ्या मेल्या नंतर हि बया ...!!!!!

भुताळी विद्या शिकून बळी देऊन पूर्ण झाली होती.

पुढच्या ५ वर्षात तिने आपल्या दोन्ही मुलांना... 

देखील खाऊन मारून टाकले होते...!!!!!

अशा सर्व गोष्टी तिच्या विषयी माहिती असताना

जाणका बाई रस्त्यात आपल्याला भेटली .... व काय कुठे

डोंगऱ्या बाबाकडे जात आहात कि काय ?????

असा प्रश्न दोघांना विचारला

तसा दोघांच्या हि मनात संशयाची  पाल चुक चुकली

आणि दोघांच्या हि अंगावर काटा उभा राहिला...

आपण कुठे निघालो आहोत हे आपल्या घरातील लोकांना सोडता कुणालाच माहिती नव्हते

मग हिने कशेकाय बरोबर ओळखले हा प्रश्न त्यांच्या डोक्यात आला 

आणि आपल्या शेटलया शिरण्या मागचे कारण हीच तर नाही ना ???

हा विचार करून दोघंही घाबरले आणी

आणि डोंगऱ्या बाबा जवळ जाऊन पटकन दुखणे निवारण्या साठी भीतीने लवकर लवकर चालायला लागले...!!!

अखेर डोंगऱ्या बाबाचे पवित्र स्थान  आले ...

से  म्हणतात कि या ठिकाणी कुठलेही भूत चेत येऊ शकत नाही आणि बाबानी बरे केले नाही असा एकही भक्त नाही.

ते १०० टक्के बरे करतातच ....

आणि म्हणून लांबून लांबून त्यांच्या दर्शनाला लोक आपल्या समस्या घेऊन येतात....

बाबा कुठलेही पैसे घेत नाही. .... !!!!

काय द्यायचे ते आपल्या मनापासून द्यायचे ...!!!

आणि निवारण करण्यासाठी बाबाला.... जे काय धान्य धुण्य लागेल ते फक्त द्यायचे...!!!!   का बाबानी सर्व ठीक केलेच म्हणून समाज ....!!!

बऱ्याच ठिकाना वरून लोक बाबाच्या त्या ठिकाणी आले होते... आणि बाबा ...काही वेळातच दुखणे बरे करून टाकत होते...

काही लोकांना खेट्या मारणे घरजेचे असायचे तर काहींना नाही .... ज्याचा त्रास जितका मोठा तितके दिवस ....  त्याने खेट्या करायच्या अशी बाबाची उपचाराची पद्धत....

अखेर दोघं बाप लोकांची बारी आली ....

दोघंही बाबाच्या जवळ गेले आणि आबांनी  नमस्कार केला...

बाबानी त्यांच्या जवळ असलेली राख त्यांच्या माथ्यावर ओढली आणि

सांगा पोराहो काय तकलीफ आहे ...

देवाला ला सगळी तकलीफ सांगा ...

तशी बाप लेकाने सर्व कहाणी सांगायला सुरवात केली.

सर्व कहाणी सांगून झाल्यावर ....

एक सूप (धान्य पाखडायचे किंवा निवडायचे साधन ) घेतला .... आणि पेला भर तांदूळ घेतले

आणि ... त्या सुपा  मध्ये ... मंत्र पुट पटत ....

पुंजाळ्या ठेवायला सुरवात केली आणि ...

त्यांना सांगितले ...

बांधावरच भांडण आहे का ???

तशे दोघंही होकार अर्थी बोलले

तुमचे घराचे जवळच एका दिशेला घर आहे का शेजारील बांधा वाल्याचा

ताशे दोघांनी होकार ला हो ...!!!

आज येत येत रस्त्यात कोणी नतुमच्यावर पाळख ठेवून होता का ???

आता ह्या सर्व गोष्टी जाणका बाईच्या निडीत इशारा करत होत्या ???

तसा बाबानी सांगितलं ....

हि सूत करणी आहे यात माणसाला बांधून  ठेवल जात...

यात समोरच्याला मारजत  नाय...!!! त्याचे हाल हाल कर्जतत्

आणि बार बार त्याच्या जवळून उग मरोग कोंबड्याचा करून घेजतो ....

म्हणजे दादा कायमचा बरा कधीच होणार नाही का ???? असा मुलगा बोलला ...!!!!

आणि बाप लेक रडायला लागले ...

तसा बाबाने बोलायला सुरवात केली कि ....

एक उपाय आहे ... पण खर्शीक आहे ...

तशे बाप लेक शांत होत बोलले ... तुम्ही पैशाचा इचार नको  करू  ...

कोणाचे तरी सालानि रहू.. पण हा उग मरोग करून टाकू ... !!!!

तुम्ही सांगा ...

डोंगऱ्या बाबाने सांगायला सुरवात केली ...माझे देवाला

बोकड्या कापायी लागलं आणि ... ११ कोंबड्या जित्याच सोडाये लागतील..., एक तांब्याची घंटा करावी लागेल...

हे सर्व ऐकून किमान आपल्याला २-४ हजार रुपये लागतील अशे विचार करत ते राहिले ....

तसा बाबा बोला ..पण एकामेच दुःख बरा होईल...

बाबाच्या म्हण्या नुसार सगळ्या गोष्टीची सोय करण्यात ली विधी झाली आणि काही दिवस  झाले आबांनी  डोक्यात आणला होतो कि

 मी बरा झालो ...

आज पुन्हा सकाळी उठून पडसा कडे गेले आणि आपली सकाळची हागण्याची विधी आटपत असताना....

त्यांचा पार्षव भाग दुखायला; लागला आणि खुप दुखतंय म्हणून ते आपल्या पार्षव भागला पाणी लावून... होणारी जळ जळ शांत करण्याचा प्रयत्न करू लागले

शांत करू पाहत असताना... त्याच्या हाताला पार्षव भागातून निघणारे रक्त लागले आणि ते   त्यांना  दिसले दिसले

तशे मी बरा झालो नाही... अजून

शेटलय पोटातच आहे... हे त्यांच्या लक्षात आले... 

 परत भीती अंगात घुसली आणि  पुन्हा ...कारभार लवकर आटपून आबा  घरी गेले घरच्यांना परत सर्व कहाणी सांगून

  सर्वाना पुन्हा चिंतेत टाकले... लांब लांबचे बाबा देव करून झाले पण आबा   बरे होण्याचे  कोणतेही लक्षण दिसत नव्हते

  आणि म्हणून सर्वानी आशा सोडून दिल्या होत्या कि आता आबा  बरे होतील....!!!!!.

 पहिलवानाची शरीर यष्टी असलेले आबा  आता जेवण आणि चिंता या मुळे वाळत चाले होते आणि अंगावर ताजे लठ्ठ पणाचे लक्षण मात्र निघूनच गेले होते.

 एके काळी कुस्त्या खेळणारा माणूस आज अंथरुणाला बिलगला होता...

 कारण पोटात शिरलेला शेटल्या बाहेर निघण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचा आबांना  त्रास होतो.

 का कुणास  ठाऊक सर्वाना आबा मरनार अशे चिन्ह दिसायला लागले होते ...

शेटलं घुसून  आज जवळ जवळ २ महिने झाले होते ...आणि

चिंतेच्या भरात आबांची प्रकृती बिघडत चालली होती...

आबा  आजारी आहे अशी खबर एव्हाना सर्व नातेवाईकांन पर्यंत पोचली आणि हि खबर....

मिळाल्यावर म्हातारं आता मरेल ...म्हणून एक एक करून नातेवाईक ... पाहायला येऊ लागले...

आणि बाबाला भेटून पाहून जाऊ लागले....

अशातच बाबाचा साला म्हणजे कुसुम बाईचा भाऊ आणि  त्याचा पुण्यात राहणार मुलगा अशे दोघे जण आबाला  पाहायला आले...

आणि  आबाला  विचारू लागले कि नेमकं काय घडलं होत...

आबांनी  सुरवाती पासून गोष्ट सांगायला सुरवात केली...

आबांच्या  गांडीत शेटलया शिरला हे ऐकून ... हेमंत  म्हणजेच साल्याचा  मुलगा हसायला लागला ...

तशे आबा  उद्गारले हसू नकोस बाबा सगळे देव करून झाले पण शेवटी मरायची वेळ आली आहे....

तू काय   शिकतोस म्हणालास ... वैद्यकीय शिक्षण घेत आहेस ... सांग काहीतरी औषध इतका हसतो  आहेस तर ...

अरे हे तुझ्या गोळ्या औषधाचं काम नाही... हि सू करणी आहे...

मंत्र मारून केलेली यातून झालं तर झालं बरा ...

तसा हेमंत बोला .... मला एक माणूस माहिती आहे पण तो हजार रुपये घेईल ... आणि एक विधी करेल ती पूर्ण करायची

तशी कुसुम बाई बोली बोलावं ना मग त्याला करून टाकू ते पण ... तसा बाबानी सुद्धा होकारार्थी मन हलवली आणि हेमंत ठीक आहे ... पौर्णिमेच्या दिवशी हे काम करावं लागेल असे सांगून निघून गेला...

चार दिवसांनी पौर्णिमा होती...

तो एका  काळ्या कपडा घातलेल्या बाबाला शुक्रवारी घेऊन आला शनिवारी पौर्णिमा होती...

बाबानी विधी करण्याआधी त्यांना काही सूचना दिल्या.

१.आदल्या दिवशी म्हणजे आज रात्री बोकड्याचे मटण पोटभर  खायचे ... म्हणजे तो भामटा पोटात दाबाजलं ...

२.सकाळी पहाटे पहाटे  शेटल्या  शिरला त्या ठिकाणी जायचं आणि तिथंच हागायला बसायचं

३.हेमंत आबा  , आणि पुजारी या पलीकडे  तिकडे कोणी येणार नाही याची काळजी घ्यायची

४. हे सगळं होत असताना बाबाच्या डोळ्याला काळा कपडा बांधायचा

५.एक दिलेली विभूती  आज पासून पुढच्या १५ दिवस पाण्यात मिसळून रोज प्यायची

 

आबांना  बरे व्हायचे असल्याने त्यांनी सर्व टी मान्य केल्या ...

हेमंत आबा आणि पुजारी पडसा कडे गेले आबांच्या  डोळ्याला पट्टी बांधण्यात ली आणि त्याला काहीच दिसत नाही... हे पाहण्यात आले...

आणि आबाला त्याचे काम उरकण्यास सांगण्यात आले...

हेमंतच्या लक्षात आले होते आबांना  मूळ व्याधाचा आजार झाला आहे म्हणून संडास करताना

आबांना  त्रास होतो आणि  शेटलय आत शिरला हा फक्त बाबाचा भ्रम आहे...

मुळात तो शेटलय समोरून येऊन मागून निघून गेला होता...

पण आबाला  झालेला गैर समज आणि सतत त्या विषयी चालणारी चिंता आबाला  अजून आजारी करत आहेत हे त्याच्या लक्षात आले.. होते

आबाला  त्याच्या कामाला लावून पुजाऱ्याने त्याच्या झोळीत पकडून आणलेला सरडा ( शेटलय ) काढला आणि बाजाच्या पाठीमागून दोऱ्याने बांधून सोडला तसा

हेमंत ओरडला पकड पकड पुजारी बाबा ...

टाक पुजारी बाबा दोरी त्याच्या गळ्यात ...

आणि अर्थात बोकड्याचे मटण   रात्री खाल्याने आबाला  हागताना त्रास होत होता ...

आणि आबाला  वाटले कि शेटलय खरंच निघत आहे...

आणि अचानक काल दिलेल्या औषधाने आबाला  मोकळी संडास झाली आणि त्यांना मोकळे वाटायला लागले ...

हेमंत ओरडला आमच्या आबाला  खातो काय घे .... शेवटी धरला का नाही...

आपलय पोटात घुसलेला शेटलय पकडला या खुशीत ...

आबाने  सर्व कार्यक्रम लवकर आवरला आणि आणि डोळ्यावरची पट्टी उघडली आता पुजारी आणि हेमंत सरडा दोरीला बांधून लांब बसले होते.

आबा  आला आणि पुजाऱ्याने विचारले हाच होता का तो ... सुकाकळीचा....

तसा बाबाने ओळखले हो हो ...हाच होता ??

बर आता तू बरा झालास ... काळजी करू नको ....दिलेली विभूती पाण्यात टाकून रोज पीत जा ...आणि संपल्यावर परत हेमंत ला सांग पुन्हा पाठवून देईन नाय तर अजून कोणी घुसायचा....!!!!

काळजी करू नको तुझी इडा पीडा मी पकडली आहे ....!!!!

त्या नंतर बाबा बरीच वर्ष आनंदाने जगले ...पण मला सांगा मित्रानो बाबांनी जर वेळीच मागे वळून पाहिले असते...तर कदाचित ....हा भ्रमाचा भोपळा कधीच फुटला असता...एक लक्षात ठेवा ...कोणालाही भूत चेत ...काढणे वा ...खोटे आरोप लावणे ...हा कायद्याने गुन्हा आहे...तसेच ...देवाच्या नावाखाली जनतेला वेड्यात काढणाऱ्या भोंदू बाबां पासून ....सावध राहा ...काय सांगावे ...जशी बाबाच्या घरात डोंगऱ्या बाबा तुट पाडत होता ...तशीच तुट कोणी दुसऱ्या तुमच्या घरात ...पाडेल ... कुठलाही देव भगवंत आपल्याला दुसऱ्या जीवाचे प्राण घ्यायला भाग पाडणार नाही...हे लक्षात ठेवा...

महत्वाचे- हि कथा लोकंमुखातली असून हि कथा सत्य असल्याचा कुठलाही पुरावा आपल्या जवळ नाही तसेच कथेत असलेल्या डोंगऱ्या बाबा व जाणका बाईचे पात्र हे काल्पनिक आहे. )

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top