पेठ जाहिराती

मुक्कामी S.T शिवशेत आंब्याची- सत्य थरार कथा

0

 मुक्कामी  S.T शिवशेत आंब्याची- सत्य थरार कथा

 

मला एस.टी मध्ये कंडक्टर या पदावर लागून जवळ जवळ १९८९ पासून १९९४ पर्यंत पाच वर्ष झाली. मी कायम नाशिक पेठ नाशिक याच गाडीवर ड्युटी साठी असायचो आज आडाचे महाले साहेब रिटायर होऊन...५ दिवस झालेत ज्या नवीन साहेबाणा  चार्ज मिळाला आहे. त्या साहेबांनी आता ड्युट्या चे वेळापत्रक व ड्युट्या बदलणार अशी घोषणा केली.

सुखाची ड्युटी व अलिशान गाडी जाऊन आता मला एखाद्या भंगार गाडीवर पाठवण्यात येईल हे मात्र नक्की होत. सर्व स्टाफ मेंबर महाले साहेबाना चांगला मानायचा कारण त्यांनी कधीच कोणाच्या मनाविरुद्ध कोणाला ड्युटी दिली नव्हती पण आता नवीन येणारा साहेब कसा आहे हे कुणाला ठाऊक पण आता महाले साहेबांच्या राज्यात जे चालत होत ते आता होणार नाही हे मात्र नक्की होत....

मुक्कामी  S.T शिवशेत आंब्याची- सत्य थरार कथा
 मुक्कामी  S.T शिवशेत आंब्याची- सत्य थरार कथा


आज ४ वाजता सर्वांची मिटिंग ठेवण्यात आली होती.मिटिंग मध्ये नवीन ड्युट्या मिळणार होत्या...मी माझी नाशिक पेठ नाशिक अशी ड्युटी संपवून आगारात आलो आणि ४ वाजायची वाट पाहत होतो.

४ वाजले तशे सर्व आगर प्रमुखांच्या कॅबीन मध्ये गेलो खुर्चांची जरा कमी होती म्हणून बाकीचे उभेच होते आगार प्रमुख आम्हाला सूचना  देत होते. माझ्या हातात माझी ड्युटी शीट मिळाली आणि जे मला नको हव होत तेच झाल मला खेड्यावरच्या भंगार गाडीवर ड्युटी देण्यात आली...

शिवशेत आंब्याच्या मुक्कामी गाडीवर ड्युटी देण्यात आली होती. मी हताश होऊन घरीगेलो आणि दुसऱ्या दिवशी २ वाजेच्य हरसूल च्या पहिल्या ड्युटी साठी हजर झालो.गाडी फार भंगार होती सारखे तिचे गेअर अटकत होते कशीबशी मी व माझ्या ड्राईवर ने हरसूल ची फेरी पूर्ण केली आणि गाडी आणून आगारात नंबर वर लावली तशी ती गाडी ४ च्या सावरणासाठी पुंडलिक नाना व विज्या भाऊ घेऊन गेले.

मी मात्र पेठ मधेच  भाडयाने खोली घेऊन राहत असल्याने माझ्या खोलीवर गेलो नाशिक वरून येणारी शिवशेत आंबे बस हि मुक्कामी असल्याने किमान ११:३० च्या दरम्यान येईल असे सांगण्यात होते. आणि ती आल्यावर पुढे मला शिवशेत आंब्या पर्यंत नेऊन तिथे मुकाम ठेवायची होती.

११ वाजले तसा मी उठलो आणि आमचा खाकी ड्रेस घालून आगारात जाण्यासाठी निघालो.आगारात गेल्यात घोंगे दादा नाईट ड्युटी साठी होते.मी त्यांना जेवले का असे विचारले आणि आगाराच्या ऑफिस मध्ये येणाऱ्या गाडीची वाट पाहत बसलो.

११:३० वाजले गाडी आली आणि आधीच्या कंडक्टर ने तिकीट कीट माझ्या हातात दिला व  तिकिटाचे कलेक्शन आगारात जमा केले आणि ड्युटी बदलली...

मी गाडी ताब्यात घेतली आणि मी व माझा जोडीदार गायकवाड भाऊ माझ्या सोबत निघाला गाडीत १२ प्रवाशी होते...रात्री येणाऱ्या प्रवाशान पेक्षा सकाळी शिवशेत आंब्या कडून येणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असल्याने ह्या मुकामी गाडीची सोय आगाराने केली होती.

आगारातून गाडी निघाली तश्या गायकवाड ड्राईवर ने गाडीत चालू असलेल्या सर्व लाईटी विझवल्या व गाडी चालू लागली मी गाडीच्या शेवटी तर गाडी चालवणारा गाडीच्या पहिल्या शीट वर असे जुन्या गाड्यांचे असायचे म्हणजे काय तर गाडीत चढायचा दरवाजा हा मागच्या बाजूने असायचा आणि म्हणूनच कंडक्टर ची राखीव शीट हि मागच्या बाजूला असायची.

गाडी चालत होती काडीचा खड खड आवाज सारखा कानात घुमत होता...त्यात कुठलीतरी एक खिडकी निट लागत नसल्याने तिचा सारखा खट-खट आवाज चालूच होता त्यात पेठ तालुक्यातील रस्ते म्हटले म्हणजे ...कोपरा पासून हात जोडून नमस्कार करण्याजोगे होते. जोपून पाहावे तर झोपही लागत नव्हती.

मी पहिल्यांदाच या रूट ला जात असल्याने इकडच्या गावांची नवे देखील मला माहिती नव्हती ...अचानक काही प्रवाशी उभे राहिले आणि दरवाजात आले तस मी त्यांना विचारल उतरायचे आहे का ...? तसा त्यातला म्हणाला हा पुढच्या फाट्यावर मी म्हटला ठीक आहे.

पुढच्या फाट्यावर गाडी थांबली आणि ८ प्रवाशी तिथे उतरले आणि गाडी परत चालू लागली अजून 15 मिनिटांनी अजून ३ प्रवाशी उतरले...आणि अजून गाडी शिवशेत आंब्याच्या दिशेने चालू लागली.

काळीभोर रात्र त्यात सर्व बाजूने असलेले दाट जंगल व जंगलान मधून येणारे चित्र विचित्र आवाज त्यात या आवाजानं भेटणारा आमच्या गाडीचा खडखडातट चालू होता आता गाडीत मी ...ड्राईवर ...आणि एक आंब्याचा एक माणूस गाडीत होता.त्याच्या सतत बडबड करण्याने त्याने दारू पिलेली असावी असे स्पष्ट लक्षात येत होते

रस्ता खूप अवघड व खराब होता त्यामुळे ST हळू हळूच चालत होती...

अचानक गाईकवाढ ड्राईवर ओरडायला लागला ये जाधव ये जाधव पुढे ये...

तसा मी पटकन ..काय झालेरे काय झाले असे म्हणत पुढे त्याच्या शीट जवळ गेलो....

तसा त्याने भीतीने हात पुढे करत मला समोरील द्रुष दाखवले

समोर पाहून माझ्याही अंगावर काटा उभा राहिला...

समोर गाडीच्या हेड लाईटच्या प्रकाशात एक वाघीण वहोती  तिची दोन पिल्ले रस्त्या वर बसलेली होती.

त्यांनी कदाचित रान डुकराची शिकार केली असावी कारण ज्या प्रकारे ते त्या शिकारीचे लचके तोडत होते आणि तोडले होते. त्या अवस्थेत त्या शिकार झालेल्या प्राण्याला ओळखणे थोडे अवघडच होते.

आम्ही हे द्रुष पाहात असताना आमच्या शोबत तिसरा व्यक्ती म्हणजे तो दारुडा मागून आला आणि तोही ते द्रुष पाहू लागला.गाईकावड बोला आता हे कधी जाणार रात्यातून ...

तसा तो दारुडा ...बोला मी कोणाला भित नाही थांब आलोच त्याला उस्कून आमची वाट अडवतो सुकळीचा

तसा त्याने गाडीच्या खिडकी तून आपला डोकं बाहेर काढला आणि वाघांना शु.....!!!! शु ....!!! हर्र्र हरर .....!!!! करायला लागला.

ये निघा रस्त्यातून फुटा बापाचा रस्ता आहेका ?

असे बोलून शिव्या द्यायला सुरवात केली !!!

तशे खिडकीतून अर्ध्या बाहेर निघालेल्या माजीरा (दारुडा) कडे वाघाचे एक बछाडे आकर्षित झाले आणि उद्या मारत गाडीच्या दिशेने आले.

आणि गाडीतून अर्धा बाहेर निघालेल्या माजरा वर उडी मारून घास मरणार इतक्यात मी त्या माजराला मागे ओढले

तसा तो माजिर अरे  कंडक्टर  सायबा !!!!

आता....!!!!!  तेचे मानगुटील धर्तू अन गोल गोल फिरवतू हेन हेलपाटा मारातू तर लांब पाडतू

तुही मधीच हिकलास !!!!

आता मला सांगा याला काय सांगू त्या वाघा पेक्षा हा मोठा वाघ !!!!

गाईकवाढ नि गाडीचे होर्न वाजवत आणि गाडीचा रेस चा आवाज करत वाघांच्या जवळ जायला सुरवात केली गाडी जवळ जात असतानाही वाघ काय जागेवरचे हलायला तयार नव्हते....

तसा अजून आमचा माजिर उठला आणि बोलायला लागला

हा सुकळीचा असा नाय ऐकायचा

सायबा टामी दे....!!!  माझे जवळ आलू तेचे एक एक वाजवून

तू  खिडकीतून टामी टाक मी खाली उतारातू ... येचे देल्या शिवाय नाय जम

तसा आमचा गाडीतला वाघ माच्या दरवाजा कडे जायला लागला तसा मी त्याच्या कडे धावलो आणि त्याला

धरून ठेवला

तसा तो ओरडायला लागला नाय सायबा तेल नाय कळ तू सोड माल तेचे एक एक टाकून येतू

कसाबसा थांबवता मी ड्राईवर ला सांगितला बाबा गाडीचा स्पीड कर आणि जोरात होर्न वाजवत घे गाडी पुढे पळतील ते ...त्याने तशेच केले ...आणि आमच्या सुदैवाने वाघ बाजूला सरकले आणि आम्ही त्याच्या शिकारीला चेंदत पुढे निघून गेलो ...

माजिर बोलत राहिला सायबा तुनी धरलास नाय त आता ह्या...!!!  हगवलीती

तसा मी आणि ड्राईवर हसायला लागलो...

गाडी एका गावाच्या जवळ पोचली तसा माजिर बोला सायबा गाडी थांबव माल उतरायचा हाये !!!

मी बेल मारली आणि तो उतरला ...

शिवशेत आंबा यायला अजून बराच वेळ होता ...

गाडी पुंन्हा शिवशेत आंब्याच्या दिशेने चालू लागली रात्रीचे १:३० वाजले   होते आम्ही १२:३० पर्यंत मुक्कामी पोचायला हव होत पण वाघांच्या मुळे आम्हाला उशीर झाला होता...

गाडी चालत होती आणि आता तर आम्ही जरा दरी खोऱ्यात उतरल्याने जंगल जरा जास्तच  दाट झाल होत...

म्हटलं आता मस्त शांत बसाव ...इतक्यात  ड्राईवर ने जोरात ब्रेक मारला...

तसा माझा तोल पुढच्या शीटच्या दांडीवर गेला आणि डोक्याला लागले...

मी म्हटलं आता काय झाल रे !!!

तसा तो बोला दार उघड प्रवाशी आहे...मी दार उघडणार इतक्यात एक बाई व तिच्या कडीवर ४ वर्षाच बाळ अशे ते दोघे दार उघडून आत आले व ती बाई सर्वात पुढे जाउन बसली

तीच सौंदर्य कधीच न पाहिलेलं अस होत..

हिरव्या रंगाची साडी परिधान केलेल.

हातात हिरव्याच बांगड्या...

अशी सुंदर स्री या आधी मी कधीच पहिली नव्हती

तिचे बाळही फार गोंडस होते तिच्या शेजारीच बसले होते..

तिला न्याहाळत असताना मी तिला म्हणालो बाई ...तिकीट घेऊन बसायचं न

तसा तिने हात आपल्या कमरेला लावला आणि आणि कमरेच्या पिशवीतून पैसे काढले...

तसा मी विचारला कुठला तिकीट देऊ तशी कर्कश अशा आवाजात ती बोली शिवशेत ....

मी तिकीट फाडण्यात १ मिनिट मग्न झालो तसा तिने हात पुढे करत मला पैसे पुढे केले...

मी खाली पाहून तिकीट फाडत असल्याने तिकिटाचे पैसे घेण्यासाठी व तिकीट देण्यसाठी वर मान केली आणि ....

माझ्या पायाखालची जमीन सरकली ....

ड्राईवर मागच्या माझ्याकडे ड्राईवर करकडे पाठ केलेल्या व माझ्याकडे तोंड केलेल्या पहिल्या शीट वर बसलेली ती

बसल्या बसल्या हात पुढे करते आणि शेवटच्या शीट वर बसलेल्या माझ्याकडून तिकीट घेते ....माझ्या तोंडातून

एक शब्दही निघत नव्हता....काय करावे काही सुचेना ....पूर्ण घाम आला होता ...!!!

अचानक माझे लक्ष त्या स्री च्या पायाकडे गेले आणि तिचे  उलटे पाय पाहून मला फार मोठा धक्काच बसला

तिचे पाय अक्षरशा उलटे होते ....

मी राम राम राम करायला लागलो आणि आता आपण मेलो असा मला वाटायला...

लागला...इतक्यात

कोणीतरी हाक मारली जाधव जाधव .....तसा मी ओ ....!!!!  

करत डोळे उघडले आणि फुटलेला घाम पुसला....

तेव्हा माझ्या लक्षात आले कि दारुड्या जेव्हा उतरला तेव्हा च शिवशेत आंबे गाव आले होते. आणि आम्ही गाडीतच झोपी गेलो होतो ....

लांब हात करणारी अशी कुठलीही बाई आमच्या गाडीत कधी चढलीच नवती ....!!!!

 

 

 

 

 

 

 

 

 

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top