तालुका पेठच्या आड.बु. ची म्हातारी ४ मिरच्या घेऊन आली, मिरच्या पिकवून निघून गेली...
सूचना :– गोष्ट सत्य घटनेवर आधारित असून या कथेच्या
पात्रांशी खऱ्या आयुष्यातील कुठल्याही माणसाशी काहीही एक समंध नाही.
सूचना :- सदरील कथा ही लोक मुखातून ऐकलेली आहे... त्यामुळे यास कुठलाही पुरावा देणे अशक्य आहे... तरी कृपया मनोरंजन व आपल्या परमपरा सांगण्याचा या कथेत प्रयत्न केला आहे...
पेठ
तालुक्यातील एक ग्रामपंच्यायती पैकी एक ग्रामपंचायत म्हणजे आड .बु . करंजाळी पासून
हरसूल रोडला निघाल्यास किमान ९ किमी अंतरावर हे गाव.
या गावात
धाकली नावाची एक म्हातारी राहत होती.तीन मुली आणि दोन मुले अशी पाच पोर वाढवून तिने
आपला संसार पूर्ण केला होता. तिच्या पाचही पोरांची लग्न करून तिचा धाकला गमावला
होता.
आता ती मात्र जवळ पास ७५ वर्षांची झाली होती आणि काठीच्या आधारावर इकडे तिकडे फिरत होती.तसा संपूर्ण गाव तिच्या परिचयाचा होता आणि सर्व गावातील लोक तिला ओळखत होती.एक दिवस शेतात जात असताना धाकली शेताच्या बांधावरून घसरून पडली आणि तिच्या कमरेला मार लागला तशी म्हातारी अंथरूनाला खिळली तशी आज २ वर्ष झाली.ती अंथरुणात आहे. सुना आणि मुल तिची सेवा करून करून थकले होते.
![]() |
| तालुका पेठच्या आड.बु. ची म्हातारी ४ मिरच्या घेऊन आली, मिरच्या पिकवून निघून गेली... |
पण सुनांनी
आणि मुलांनी तिच्या सेवेत कुठलीही कमी पडू दिली नव्हती.आज अचानक म्हातारी गुचक्या
द्यायला लागली होती म्हातारी मरते कि काय म्हणून...
शेवटची भेट
म्हणून मुलांनी आपल्या बहिणींना व इतर नातेवाईकांना निरोप धाडले....
कि म्हातारीची
शेवटच्या घटका मोजत आहे ....!!! तरी आपण सर्वांनी शेवटची भेट म्हणून भेटून जावे...
म्हातारी ने
अन्न पाणी सोडले होते आज २ दिवस झाले कहीही खालेले नव्हते...
एक एक
नातेवाईक जमा होण्यास सुरवात झाली होती ....
जो येत होता
तो ? म्हातारी जवळ जावून ओक्षा बोक्षी रडत होता...
प्रत्येक जन दुखी
होता....आता आपली जीजी,नाणी,आत्या,मावशी ,काकी,मामी ,आजी,आई ,जाणार ह्या दुखाने
प्रत्येक जन चिन्ह बिन झाला होता.
म्हातारी
मात्र आज पाच दिवस झाले अन्न पाणी सोडला होत आणि ती गुचक्या देत होती.जेवण सोडले
होते नुसती पाण्यावर पाच दिवस होती काही बोलत नव्हती व डोळेही उघडत नव्हती सर्व मुली
व त्यांचे नवरे म्हणजे जावई देखील आले होते.
सर्व नातेवाईक
मंडळी येवून आज ६ दिवस उज्याडला होता...पण म्हातारी जाण्याचे कुठलेच चिन्ह दिसत
नव्हते...
सर्व नातेवाईक
मंडळी हातातले काम टाकून आल्यामुळे सर्व म्हातारी कधी वर जाते याचीच वाट पाहत
होते.
अशातच एकाने
फर्मान काढला सर्व नातेवाईक मंडळी आणि जावई मंडळी आली आहे ...तर एखादा बोकुड
कापा....म्हातारी किती दिवस जगते आणि किती दिवस नाही आणि थोडा रसा म्हातारीला पण
पासून पहा काय सांगावा उठून बसला....!!!
हा विचार
तिच्या मुलांना पटला व लगेच ....बोकड्या आणून आह्ळा करण्यात आला....
सर्व
नातेवाईकांना येवून आज 7 दिवस पूर्ण झाले होते...बोकड्याचे जेवण हि खाऊन झाले होते
आणि ....एक एक नातेवाईक सुधा आपआपल्या रस्त्याला निघून गेले
सर्व नातेवाईक
निघून गेले...आणि घरी पोचले असती आणि काही तर घरी सुधा पोचले नसतील
(कारण त्या
वेळी कुठल्याही बस किंवा गाड्यांची सुविधा नव्हती बैल गाडी घेऊन किंवा पायी चालत जाऊन
दुसऱ्या गावी जावे लागत असे)
अशातच म्हातारीने
श्वास घेणे बंद केले आणि म्हातारी
गेली....
सर्व
नातेवाईकांना निरोप पाठवून परत बोलवण्यात आले सर्व माणसे येण्याची वाट पहिली जावू लागली.
म्हातारी रात्री गेली होती जेमतेम मध्य रात्रीच्या सुमारास...आता जवळ जवळ दुसऱ्या
दिवसाची दुपार झाली होती. अजून... नातेवाईक लोक येतच होते ....
आणि ते येत
आहेत म्हणून डायरेक्ट नेऊन अंत्य संस्कार करणे चुकीचे होते.
गावातील
लोकांच्या पोटाला आट्य पडल्या होत्या ....
कारण गावातील लोणची एक प्रथा होती कि जो पर्यंत प्रेताचे अंत्य संस्कार केला जात नाही तो पर्यंत कुठल्याही प्रकारचे अन्न गावात बनत नाही... अजूनही हि प्रथा संपूर्ण पेठ तालुक्यात चालु आहे. तसेच अंत्य विधी झाल्या नंतर गावातील सर्व बायका हंड्यामध्ये पिण्यासाठी ठेवण्यात आलेले पाणी ओतून देऊन नवीन पाणी भरतात.
पाहुणे येणे
अजून थांबले नवते अखेर सर्व मुली जावई आले आणि गावकऱ्यांच्या पोटाला पडलेल्या
ताणामुळे लवकर तिर्डी उचला असा ओरड चालू झाला.
तस अजून रड
गोंधळ चालू झाला आणि तिर्डी उचले गेली आणि म्हसन वटी कडे सर्व निघाले सर्व मुली
रडत होत्या मुलांच्या देखील डोळ्यात पाणी दिसत होते.
विसाव्या वर
सर्व माणसे थांबले आणि अजून एक प्रथा दिसली ती म्हणजे बाई माणसा म्हसन वटीत जात
नाही. ती सर्व विसाव्या वरून परत आली...
पुढे जाऊन
काही गावातील तरुणांनी लाकडे रचून ठेवली होती. आता फक्त तिर्डी तिथे नेली आणि
त्यावर ठेवले कि त्यानंतर अगणी दिला कि परत घरी यायचे इतकाच बाकी होत...
तिर्डी म्हसन वाटीत
नेण्यात आली आणि रचलेल्या लकडावर ठेवण्यात आले....आणि अग्नी देणार
इतक्यात
म्हातारी .....तिर्डी वरून उठून बसली तसे सर्व घाबरले आणि बाकीचे तर पळून गेले...
पण तिच्या
स्वताच्या मुलांना तिने हक मारत मी जिवंत आहे हे सांगितले आणि हे तुम्ही काय करत
आहात.... मला जीतल्या जीवी जाळत आहात का ?
मड .....निग्याहो
...माल जीतले ...जीवी ....जाळाये निघलस....
कुत्र्या हो .....बहाचीस
पोहचवली तर माझी हाडका पोचवायची तयारी पण केली ....
अशी... बोलत
होती अखेर तिला...
तिर्डी वरून
खाली उतरवण्यात आले आणि तिला घडलेला सर्व प्रसंग सांगण्यात आला...
तसा तिनेही
त्यांना तिच्या परत जिवंत होण्या मागचे कारण सांगितले...
मला न्यायला
यमाचा दूत आला होता ....
तो मला घेऊन
गेल्यावर ...
यमाने माझे
पुस्तक वाचले तेव्हा....
त्याच्या
लक्षात आले कि म्हातारीचे अजून बरेच दिवस बाकी आहेत...
जीवन रेषेच्या
पुस्तकात लिहिल्या प्रमाणे तिला परत खाली पाठवण्यात आले...
आता सर्व हि
गोष्ट ऐकून हसायला लागले व म्हातारी जगली खरी पण म्हातारी येडावली अशे बोलायला
लागली...
तशी म्हातारी
बोली ...मला खाली पाठवत असताना परत जगायचं वेळ मिळाला म्हणून मी मला चालता यावे व
कोणाला माझी सेवा या काळात करावी लागू नये असा वरदान मी यमा कडून मागून घेतला..
आणि हे बोलताच
म्हातारी काठीचा आधार .....न घेता ....आपल्या स्वताच्या पायावर उभी राहिली
हे पाहून
सर्वांन आश्चर्याचा धका बसला...!!! दोन वर्ष
म्हातारी अंथरुणात होती आणि आता मरून परत जिवंत झाली आणि चक्क चालायला लागली...
अजून म्हातारीने
सांगितले कि यमाने मला ४ मिरच्या दिल्या आहेत व सांगितले आहे कि या मिरच्या जेव्हा
पिकतील तेव्हा तू मरण पावशील....
तशा सर्वाना
अजून एक आश्चर्याचा धक्का बसला एकाने सांगितले कि कुठे आहेत त्या मिरच्या....
तसा....म्हसन वटीत आणताना तिच्या हातात काही नवते व म्हसन वटीत कोण मिरच्या आणणार ....ही सुधा एक गोष्ट होती ....
म्हातारीने
हात पुढे केला व हाताची मुठ खोली तर एक दम ताज्या तवान्या अशा ४ मिरच्या सर्वाना
तिने दाखवल्या रिकाम्या हाताने जाळायला आणलेल्या म्हातारीच्या हातातल्या मिरच्या
पाहून ....सर्व जन थकच झाले होते....
पुढे हि धाकली
बाई स्वताच्या पायावर चालत जवळ जवळ ८ वर्ष आणखी जगली आणि एक दिवस देहवाऱ्यात
ठेवलेल्या मिरच्या तिला...लाल दिसायला लागल्या आणि तिने आपल्या मुलांना आदेश दिला
कि बाळानो आता माझ्या जाण्याची वेळ जवळ आली आहे...
या आठ वर्षात
मी सर्व सुखे भोगली आहेत जी मला भोगणे शक्य नवती ....
तशी दोन्ही
मुलांनी आपल्या बहिणींना बोलावून घेतले...
बहिणी आल्या
सर्वांशी आनंदाने धाकली बाई बोलली आणि त्या दिवशी विशेष म्हणजे तिने
आपल्या हाताने जेवण बनवून आपल्या सर्व मुलांना जावयांना व सुनांना तिने त्यांच्या
आवडीचे करून घातले व दुसऱ्या दिवशी
म्हातारी हसत खेळत खांबाला टेकून असताना आपला प्राण त्यागून मुला बळान मधून निघून
गेली....
तिच्या मरणा
सोबत तिला मिळालेल्या मिरच्या सुधा जाळल्या जाव्या अशी तिची इच्छा होती ....मुलांनी
तिला जाळायला नेले असताना ....देहवाऱ्यातून तिला मिळालेल्या मिरच्या काढल्या.....
बघतात तर काय ....!!!!! तब्बल ८ वर्षांनी ह्या मिरच्या हिरव्याच्या संपूर्ण लाल झाल्या होत्या व कडक सुकल्या होत्या....
अंत्यसंस्कारा नंतर हि एक कथाच बनून राहिलेली सत्य घटना आहे कि फक्त अफ़वा हे माहिती नाही पण आमच्या पर्यंत लोक मुखातून ही घटना ऐकायला मिळाली आपल्याला कशी वाटली...हे आपण आम्हला लेखाच्या खाली कमेंट करून सांगा तसेच या लेखाची सत्यता पडताळायची असल्यास ...पेठ तालुक्यातील आड.बु.गावाला नक्की भेट द्या कोणीन कोणी त्या काळातील जिवंत असेलच जो त्या वेळी एक लहान मुल होता....आणि हि गोष्ट ऐकल्यावर तुम्हाला सांगेलच कि हिकथा संपूर्ण पणे खरी आहे कि खोटी....तर अशाच खऱ्या पेठ तालुक्यातील खऱ्या कहाण्या वाचण्यासाठी
तालुका पेठ
च्या वेबसाईट वर ...भेट देत राहा ....कारण वाचेल तो वाचेल नाहीतर पुचकेल..🤣🤣😂😂



