पेठ जाहिराती

गोष्ट पेठच्या तळ्याच्या बांधावरची - मी आणि ती

0

गोष्ट पेठच्या तळ्याच्या बांधावरची - मी आणि ती   

शाळा ! खूप शिकवलं या शाळेने ! ५ वी ते १० वी याच शाळेत होतो मी ! हा माझा वर्ग ! इथे आमचे मास्तर बसायचे ! इथे मी बसायचो येथे राम काका बसायचे अस सर्व मी माझ्या मुलाला जो आता १० वी मध्ये आहे. त्याला सर्व आनंदाने सांगत होतो.मला एक एक आमच्या खोड़या ,केलेला सर्व डांबिस पंना आठवत होता.माझा मुलगा मात्र मंत्र मुग्ध होऊन आश्चर्याने सर्व ऐकत होता.

आपले वडील एके काळी असे होते यावर त्याचा विश्वास बसत नव्हता. प्रत्येक बेंच वरती कोण बसायचं या सर्व गोष्टी सांगत असताना तो बेंच मला दिसला. त्या बेंच जवळ मी गेळो एका वेगळ्याच भावनेने मी त्या बेंच वर लिहिलेल्या नावावर हात फिरवला आणि माझ्या डोळ्यात अश्रू आले. मुलाने विचारले पप्पा काय झाले ? मी म्हणालो काही नाही बाळा असाच जुने किस्सा आठवला तर थोडा भावुक झालो.
गोष्ट पेठच्या तळ्याच्या बांधावरची  - मी आणि ती


मुलगा आणि मी शाळेतून बाहेर निघालो आणि गाडीत बसून पुन्हा आमच्या रस्त्याला लागलो.गाडी चालवता चालवता माझ्या मनात त्या बेंच ची गोष्ट फिरु लागली आणि क्षणार्धात सर्व आठवायला लागले. कुठे असेल ती ? काय करत असेल ? खुश तर असेल ना ? या सर्व गोष्टी चालू होत्या आणि अचानक गाडी समोर एक लहान मुलगी आली मी गाडीचा ब्रेक मारला आणि गाडीतून उतरलो व त्या मुलीला विचारू लागलो. बाळा लागल तर नाही ना ? ती म्हणाली नाही काका ? काही नाही झाल !

आणि ती तिच्या साईकल वर बसून पुढे निघून गेली. मी पुन्हा गाडी चालवायला बसत असताना माझा मुलगा अंश बोलला पपा अस करा आता जरा गाडी मी चालवतो आता आपण जवळ आलो आहोत. लवकरच आजोबान कडे पोचू तशी त्याने गाडी माझ्या हातून घेतली व मला दुसऱ्या बाजूला बसवले व तो गाडी चालवू लागला. त्याला उत्तम गाडी चालवता येते यात काही शंका नवती. नाही म्हणले तरी गावाला पोचण्यासाठी अजून २ तास लागणार होते. म्हणून मी तोंडावर रुमाल घेऊन थोडे डोळे मिटले तसा बेंच वर असलेल्या नावाचा विचार तिच माझ्या आयुष्यात येन ते गोड क्षण मला सर्व आठवू लागले.

सातवी मे च्या सुट्या संपल्या आणि 8 वि चा वर्ग चालू झाला नवीन बेंच, नवी शिक्षक-शिक्षिका, नवीन कपडे ,नवीन वह्या ,नवीन पुस्तके आणि नवीन पुस्तकांमधून येणारा तो सुगंध, यात मी हरवून गेलो होतो . या वर्षी माझ्या वर्गातील हितेश ला हरवायचे आणि त्याच्या पेक्षा जास्त गुण पडायचे असे मनाशी बाळगले होते.

नवीन नवीन असणार सर्व नॉर्मल होणारच होत कि एके दिवशी आमचे वर्ग शिक्षक बागुल सर वर्गात आले व एका दोन शेंड्या असलेल्या म्हशीला आय मीन ! कि एका मुलीला ते वर्गात गेऊन आले.तशी दिसायला सावळी होती.मी आपला उगाच तिला म्हैस म्हणालो. असो मुदा हा आहे ! कि आमच्या वर्गात एक नवीन अडमिशन झाले होते. बागुल सरांनी सर्वाना तिचा परिचय करून दिला व सांगितले कि इला कोणी त्रास देऊ नका ! व नवीन मित्र मैत्रीण बनवण्यास सांगितले.

वर्गातल्या हुशार मुली जवळ तिला बसायला पहिल्या बेंच वर जागा करून दिली.तशी ती पण स्थानपन्न झाली आणि शिकवणे चालू झाले.मी पण फस्ट बेनचर असल्याने मी माज्या माझ्या गुर्मीत असायचो.हळू हळू दिवस गेले तिला मैत्रिणी मिळाल्या आणि मला पण तीच नाव एव्हाना कळून गेल होत. तीच नाव प्रियांका सगळे तिला पीहू म्हणयचे.

पीहू सुधा अभ्यासात बऱ्या पैकी हुशार होती. सर्व काही नॉर्मल झाल होत .बाहेरून आलेला तो परजीवी आम्ही आमच्यात सामावून घेतला होता.परजीवी अशा साठी म्हणालो कि काहीहि लागले कि माझ्या ग्रुप मधून कोणाकडे तरी तिने मागितलेच समजा अर्थात काय तर परजीवी स्वताचा काही करायलाच नको फक्त आयत पाहिजे ! असा हा परपोशी आमच्या जीवावर जगत होता.

अशेच पावसाळ्याचे दिवस सुरु झाले.तो सुरवातीचा झिंम झिम पडणारा पाउस सुरु झाला ,PT चा तास असल्यावर आमचे खेळण्यासाठी बाहेर निघणे बंद झाले होते.आम्ही तरी कधी कधी पाऊस थांबलेला असताना PT च्या तासाला बाहेर पडायचो आणि खेळायचो.
गोष्ट पेठच्या तळ्याच्या बांधावरची  - मी आणि ती

आज असाच पाऊस थांबलेला दिसला आणि आम्ही सर्व उड्या मारत PT च्या मोरे सरांची वाट न पाहता मैदानावर गेलो आणि आमचा आवडता खेळ फुटबाल चालू झाला.मनसोक्त खेळून आम्ही परत वर्गात येत असताना मी खूप माखलेला व दमलेला असल्याने हळू हळू चालत होतो. अचानक मला रस्त्यावरून येणारी गाडी आणि एक मुलगी दिसली खूप घोळका झाला कुणी त्या मुलीला हात लावत नवते मी त्या घोळक्याच्या ठिकाणी पोहोचलो आणि बघतो तर काय आमच्या वर्गातील पीहू तिथे पडलेली होती.मी कशाचाही विचार न करता तिच्या जवळ गेलो आणि माझ्या मित्रांना हाक मारू लागलो मित्र पटकन आले.

तिला आम्ही सर्वांनी उचलून रस्त्यातून बाजूला केले व तोंडावर पाणी मारू लागलो. हितेश ला तिच्या घरी तिच्या आई वडिलांना बोलवण्यासाठी पाठवले होते. तो पर्यंत मी तिच्या डोक्याला झालेल्या जखमेला माझा रुमाल दाबून तिथेच बसलो होतो.अर्थात खोडकर आणि निडर असलो तरी मी हि तेव्हा आठवी मध्ये असणारा एका छोटा मुलगा होतो. मग मी कसा शांत बसू मला पण तिची ती अवस्तः पाहून रडू आल होत.

माझ्या सुद्धा डोळ्यातून पाणी निघायला सुरवात झाली.माझा शाळेचा शर्ट संपूर्ण रक्ताने माखला होता. आमचे वर्ग शिक्षक आणि PT शिक्षक घटना स्थळी पोचले होते.थोड्याच वेळात तिचे आई वडील एक ओमिनी घेऊन आले आणि कधी माझ्या पासून तिला घेऊन गेले ते कळल नाही मला मात्र रडू आवरेना.

जस तिला घेऊन तिचे आई वडील गेले तसे बागुल सर मला घेऊन वर्गात आले.माझा अवतार पाहून मला सांगितल कि गणेश तू घरी जा आणि कपडे बदल आणि उद्याच शाळेला ये ! मीही दप्तर घेतले आणि शाळेतून घरी जाण्यास निघालो आणि घरी गेलो.दुसऱ्या दिवशी शाळेत गेलो.अर्थात वर्गात पीहू दिसत नवती.

ती पुढचे काही दिवस दिसणार नव्हती पण कोण जाने मी ती परत येण्याची वाट पाहत होतो.मला सारख तिला विचारव वाटत होत कि तुला आता बर वाटत आहे ना ? तिची खुशाली कळत नव्हती त्यामुळे मी खूप व्याकुळ झालो होतो. शेवटी तो दिवस उजाडला आज आल्या आल्या मला ती दिसली. काय माहित का तिला पाहिल्यावर मला एक विचित्र अनुभूती झाली “मेरे दिल को चैन मिला” पण मी तिच्याशी बोल्लो नाही.

प्राथना झाली आम्ही पुन्हा आम्ही आमच्या वर्गात आलो आणि सर्व मुली माझ्यावर हसत होत्या का ते मला कळाल नाही.पण सारक्या माझ्यावर असणाऱ्या मुलीना शेवटी मी विचारल कि काय झाल काय माझ्याकडे पाहून एवढ खिदळायला झालं तेव्हा वर्षा म्हणाली काही नाही रे! असच आणि परत हसायला लागली तिला हसताना पाहून अजून बाकीच्या मुली पण हसायला लागल्या. मी जरा धीट मनाचा असल्याने मी ते इग्नोर केल आणि माझा माझा बीजी झालो ... मधली सुट्टी झाली .

मी जेवणासाठी बाहेर पडलो डबा घेऊन आणि जेवण झाल्यावर.. माझ्याकडे असणारे 10 रुपये घेऊन कोणाला न सांगता एकटाच शाळेच्या बाहेर पडलो कारण मला आवडणारे फुटाणे मला एकट्यालाच खायचे होते. फुटाणे खाऊन पुन्हा मी वर्गात आलो आणि माझ्या बेंच वर बसलो तोच माझ्या गँग मधील एकाने मला आवाज दिला ये रडू...!! ये रडू...!! ये रड्या....आणि सगळे हसायला लागले

पहिले तर मला काही समजलेच नाही, पण अचानक सर्व मला का असं बोलत आहे याचा विचार मी करायला लागलो आणि माझी ट्यूब पेटली... ती पिहू टिहू आली ना..! तिनेच घोळ घातला आहे. माझा शक एक दम बरोबर निघाला ... सगळ्यांन सोबत मिळून ती पण मला चिडवत होती.

रडक्या रडक्या, मुलगा असून रडतो ... ज्याला लागलं होत तो नव्हता रडत आणि वेगळाच रडायला लागला होता... मला फार राग आला... होता..!

मी डायरेकट सांगितले अग मूर्ख! तू मला थँक यू बोलायला पाहिजे तर तो माझ्या वर हसतेस त्या दिवशी जर मी तिथं आलो नसतो तर तुला कोणी हात लावत नसता डॉकटर काय बोला होता माहिती आहे? रक्त खूप गेलाय बर व्हायला वेळ लागेल पण ज्याने कोणी वेळीच रुमाल दाबला होता त्याचे आभार मानायला पाहिजेत असे डॉक्टर तुझ्या वडिलांना सांगत होते खोटं तर विचार जाऊन... मान्य आहे मी रडत होतो पण काय कराव ते सुचत नव्हता म्हणून मी रडत होतो.

मला रक्त पाहिलं का चक्कर येते तरी मी तुझ्या जवळ थांबलो हे माझं चुकला ना! म्हणून तुम्ही सगळे माझ्यावर हस्ताय हसा हसा...!! आज पासून मी कोणाशीच बोलणार नाही. असा बोलून टाकला सर्वाना आणि मधल्या सुटीतून दप्तरं घेऊन घरी निघून गेलो तसा 2-3 दिवस काय आलोच नाही.

वर्गातला आवडतीचा विद्यार्थी येत नाही म्हणाल्यावर बागुल सर स्वतः घरी आले आणि मला विचारला तू आजारी नाहीस काही दुसरा प्रॉब्लेम नाही ना! तसा मी त्यांना घडलेला प्रकार सांगितला तस त्यांनी मला समजावलं तू त्यांच्याशी बोलू नकोस पण वर्गात मात्र ये असं झाल्यावर तुझाच नुकसान आहे. तस मी होकार अर्थी मान हलवली आणि सर चहा घेऊन निघून गेले दुसऱ्या दिवशी मी शाळेत गेलो.

सर्वांनी माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण मी मात्र अति धीट आणि इगो वाला.. अजिबात कोणाशी बोलो नाही मधली सुट्टी झाली. सर्व वर्गातून डबे घेऊन बाहेर गेले आणि जेवण करू लागले त्यांनी मलापण घेऊन जाण्याचा प्रयत्न केला.. पण कसला त्यांच्यात जातोय. वर्ग सगळं सुना पडला होता मी माझा डबा काढला आणि जेवायला सुरवात केला पोळीचे 3-4 घास खाल्ले आणि कुणाच्या तरी पावलांचा आवाज आला अर्थात मी कुणाशी बोलत नसल्याने मी तिकडे लक्ष देण्याचा प्रश्नच येत नाही.

ती व्यक्ती माझ्या दिशेने चालत आली आणि माझ्या पाठीमागच्या बेंच वर बसली मी माझं माझं खात होतो. पाठीमागच्या व्यक्तीने त्याला इग्नोर केल जात आहे हे समजताच त्या व्यक्तीने माझ्या कमरेल बोट लावले आणि गुद गुली केली तसा मी उठून दुसऱ्या बेंच वर जाऊ लागलो.त्या व्यक्तीने माझा हात पकडला आणि बोली नको जाऊस कुठे इथेच बस 🤣🤣 इतक्या वेळ मी भ्रमात होतो कि माझा मित्र राम मला येऊन मानवण्याचा प्रयत्न करत आहे.

हा तर पोरीचा आवाज निघाला मी मागे वळून पाहिलं कोण आहे. ती दोन शेंड्या वाली तर ती पिहू निघाली मी रागत पाहून तिचा हात झटाकला आणि परत आहे तिथे बसून घेतले. ती मागून उठली आणि माझ्या समोर येऊन कान धरून उभी राहिली... ती बोलू लागली
गणू प्लीज बोलना माझ्याशी ....
मी अशीच चेस्टा करण्याचा प्रयत्न केला तुला दुखावन माझा हेतू नव्हता...!!!
Sorry यार गणू तू असं नको करू... माझ्या मुळे तू इतरांशी तरी बोलायचं बंद नको करू
चूक माझी आहे. मी सर्वाना ती गोष्ट सांगायला नको होती...
मी घरी विचारला तुझ्या मुळेच मला जीवन दान मिळाल असं आई सांगत होती.

आणि तू मला दवाखान्यात सुद्धा पाहायला आला होतास हे ही मला समजला...
मी तुझी माफी मागते तू सर्वांशी बोल... माझ्या मुळे तू तुझ्या मित्रानं पासून लांब राहू नको...
Plzzz मला माफ कर... Plzzz
मी रागत वर पहिला आणि हळूच आणि बोलो 🤣🤣 बस कर पगली अब रुलायेगी क्या ? तस तिच्या डोळ्यातून पाणी आला आणि ती मला पुन्हा पुन्हा sorry बोलायला लागली मी म्हणालो बस्स ना बया झाला ना ड्रामा खतम आता जाय डबा खाय ... तशे सगळे...दरवाजातून ओरडत ओरडत आत आले
बोला रे....!!! बोला रे...!!!! बोला रे...!!!!

माझे सगळे मित्र मैत्रिणी आल्या आणि सगळे मला sorry बोलायला लागले... आता मला सांगा भाऊला इतकी इज्जत दिल्यावर भाऊ रागा भरून बसणार आहे.. का? गेला ना माझा राग...! सर्व जण एकत्र बसलो... ती मात्र प्रत्येक 5 मिनिटांनी मला sorry बोलत होती...

जेवण करत होती आणि sorry बोलत होती... मग मी बोलो हे हिला सांगा बस झालं... नय तर ती sorry का बोलते याच्यावरून मी बोलणार नाही तशे सगळे हसायला लागले... राम मधीच बोला पण गणू काय पण बोल... गड्या.... तू रडायचं आहेस.... 🤭🤭 मी त्याला वाकवला आणि चांगल्या दोन बुक्या हाणल्या...

तशे सगळे हसायला लागले 🤣🤣🤣

जेवण झाली जेवाच्या सुट्टी नंतर तास झाले आणि.. शाळा सुटली आणि आम्ही सर्व घरी जाण्यासाठी निघालो ...आम्ही तेव्हा तालुक्याच्या गावीच राहायचो मी माझ्या रस्त्याने जात असताना पिहूनी मागून हाक मारली थांबरे मला पण येऊ दे... मी मागे वळलो आणि तिच्याकडे पाहून उभा राहिलो तशी 10-12 पावलावर असणारी ती जोरा जोरत पाऊल टाकून माझ्या जवळ आली आणि आम्ही सोबत चालु लागलो.
चालता चालता ती मला बोलू लागली

तू माझ्यावर नाराज तर नाहीस ना?
अशील तर plzz मला माफ कर
मी फक्त एक just हसले होते रे!!
पण घरच्यांनी सांगितलं कि त्या वेळी नेमक काय घडलं होत आणि किती लागला होत तेव्हा मला समजला कि आज मी जिवंत आहे ती फक्त तुझ्या मुळे!!!!
Plzzz मला माफ करशील
मी थांबलो आहे... आणि 🤨तिला बोलो ये जा घरी मी नाही जात... तशी तीही थांबली... बोली अरे Sorry Sorry Sorry रागावू नकोस

मी हसलो आणि पुन्हा चालु लागलो... ती बोली तुला माझ्या आईने बोलावलंय एक दिवस आमच्याकडे जेवायला.. पप्पाना पण तुला भेटून तुझे आभार मानायचे आहेत...

मी म्हणालो नको बाई घरी नेशील आणि आणि पका बद्या मार लावशील...मी नय येत 🤣🤣 आणि दोघ पण हसायला लागलो

बर असुदे नको येऊ... ऐकणं तुला काहीतरी द्यायचं आहे... मी म्हणालो काय?...खायचं असेल तर दे... तिने एक मोठं चॉकलेट काढून माझ्या हातात दिल... मी म्हणालो अरे वा! भारी ग याच्या आधी मी इतकं मोठं चॉकलेट कधीच खाल्लं नाही... म्हटलं इतकं मोठं नको अर्ध घे तू...!

तशी ती म्हणाली आता पर्यंत मी तुला sorry च बोलत राहिले... तुझे धन्यवाद करायचे होते म्हणून मी चॉकलेट आणलं होत ते राहूनच गेल...

चॉकलेट घेतला आणि बॅग मध्ये ठेवून घेतला आणि आम्ही आप आपल्या घरी गेलो जाताना ती बोली उद्या भेटू ... मी ही म्हणालो भेटू भेटू....

मित्रानो ही गोष्ट फार मोठी आहे 2-3 भागा मध्ये ही उपलब्ध होईल तो पर्यंत आमच्या सोबत जोडलेले राहा, आपल्या ला आता पर्यंतचा भाग आवडला असल्यास `आपल्या प्रिय जणांना ही स्टोरी नक्की शेयर करा...कारण ती किंवा त्याला आठवण्याचा हक्क फक्त तुम्हालाच नाही तर तुमच्या प्रिय जणांना सुद्धा आहे... कारण प्रत्येकाची प्यार वाली स्टोरी असतेच.... 


आमच्या टेलिग्रामला जोडले जा ! खालील टेलिग्राम नावावर टिक करा 


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top