पेठ जाहिराती

गोष्ट पेठच्या तळ्याच्या बांधावरची - मी आणि ती- भाग २

0

गोष्ट पेठच्या तळ्याच्या बांधावरची - मी आणि ती  भाग २ 


आज वर्गात जाता... जाता.. मी सटकलो आणि घसरून पडलो.तशी ती बेंच वर बसलेली होती, पटकन उठून माझ्या जवळ आली आणि मला उठवायला लागली. सर्व वर्ग पाहत होता.मुळात ती एक छोटीशी गोष्ट होती इतका बाहू करण्याची गरज नव्हती.का कुणास ठाऊक ती असं का वागत होती.तुला लागला का ? खूप दुखतंय का ? असले प्रश्न येवू लागले.आता रोजच माझा डबा तिच्या डब्यातून येवू लागला होता. मला काही समजतच नव्हते कि नेमक काय चाल आहे.हे समजायला मार्ग नव्हता मला अस वाटत कि तिला अपघातातून वाचवल्या मुळे ती माझ्यावर खूप खुश झाली असणार आणि आभार व्यक्त करण्याच्या हेतूने ती हे सर्व करत असेल. असा माझा समज झाला पण तिची माझ्या संधर्भात असणारी काळजी वाढत चालली होती.आणि त्याकाळजीचा मला त्रास व्हयायला लागला होता. कधी मी जेवलो नाही तर ती पण जेवत नसायची.मी उदास असलो तर ती पण उदास असायची मी कोण्या माझ्या मैत्रिणी बरोबर बोलो कि मधि मधी येणार आणि मधीच तिचा चमचा हलवणार. मधी-मधी बोलणार थोडक्यात काय! तर तिला त्याचा राग यायचा कुठे निवांत बसलो कि आलीच पाहायला मला, आणि माझ्याची बोलायला. तिला वाटत माझ्या वाचून करमतच नसाव बहुदा. सारखा तिला मी पाहिजे असायचो. बऱ्याच वेळा तिने माझा हात पकडण्याचा प्रयत्न केला होता. पण माझ्या आईने मला सक्त बजावल होत.

गोष्ट पेठच्या तळ्याच्या बांधावरची  - मी आणि ती- भाग २ 



आपण आता मोठे झालो आहोत मान्य आहे आपल्या खूप मैत्रिणी आहेत्त आणि त्या आपल्याशी एकदम जवळीकतेणे वागतात पण म्हणून कधीच आपण होऊन कोणत्या मुलीचा हात पकडायचा नाही.आणि कुणी पकडलाच तर आपण लगेच सावध राहावे.तशी माझी आई मला जे सांगेल ते मी कटाक्षाने पाळत होतो. म्हणून मी तिच्या पासून लांब राहायला सुरवात केली होती. ती मात्र माझ्या जवळ येण्याचा एकही क्षण वाया घालवत नव्हती.गोष्ट थोडी सोपी होती.कि तिला माझ्यावर प्रेम जडले होते.पण मीच इतक्या शेंबड्या होतो कि मला ते समजत नव्हते.एक दिवश शाळेत तास चालू असताना तिने मी तिच्याकडे पाहावे यासाठी मला पेन्सिल चा एक तुकडा फेकून मारला. आणि तिचा नेम चुकल्याने ती पेन्सिल माझ्याच वर्गातील संकेत नावाच्या मुलाच्या गालावर जाऊन लागली.

तस मला हसू आवरला नाही आणि अरे संक्या तुला !!! संक्या तुला !!! अरे अरे काय हे मी काय पाहतोय आम्ही अस ओरडायला लागलो. आणि बाकी मुलांनी देखील हे ऐकल्यावर संकेतला एका पोरीने चक्क पेन्सिल फेकून मारली अरे अरे ..!!! बिचारा संक्या अरे काही समजत का तुला!!! अक्षरशा तिने पेन्सिल फेकून मारली.तसा संकेत ला आला राग आणि आज शाळा सुटे पर्यंत पोरांनी संक्याला एका पोरीने पेन्सिल फेकून मारली हे वाक्य सांगून सांगून बेजार करून टाकले. शाळा सुटली तसा आमची पूर्ण टीम बाहेर निघाली आणि मी संक्याला फुसकी मारली तू पेन्सिलचा बदल घेतला पाहिजे.दिला भरवून त्याला. संक्याला पण खूप राग आला होता.दुसऱ्या दिवशी तिला नवीन पेन्सिल आणून जोरात फेकून मारायची अस ठरलं. संक्या सारखा भिकारी असायचा म्हणून, मग बदला घेण्यसाठी आम्ही सर्वांनी त्याला मदत केली.सर्वांनी मिळून पैसे जमवले आणि एक नवी कोरी ५ रुपयांची पेन्सिल विकत आणली आणि ठरल्या प्रमाणे तिला मारण्यासाठी सर्व सज्ज झाले. मला फार दिवसांचा होत असलेला त्रास माझ्या मनात आगे सारखा धग धगत होता.म्हणून या विशेष क्षणी मी असणे महत्वाचे होते.तेव्हाच माझ्या आत्म्याला शांती मिळाली असती ना !!! आणि दुपारच्या सुट्टीत तो सोंड्या उठला आणि पाठमोऱ्या पीहू कडे जोरात पेन्सिल भिरकावली आणि बस होत्याच नव्हतं झाल.

ती बाजूला झाली आणि एक दुसरीच दोन शेंड्या वाली पुढे आली आणि गेम झाला ती पेन्सिल पीहू ला न लागता त्या दोनशेंड्या वालीला लागली....! आई ग !!!!! असा आवाज आला आणि सर्व पब्लिक हसायला लागली.कारण निशाना चुकला होता. आणि वर्गातल्या सर्वात भांडकुदळ पोरीला जाऊन लागला होता.थोड्याच वेळात आमचाच डाव आमच्यावर उलटला आणि आमची नावे सरांकडे गेली.तशे आता आपल्याला पाठीवर आणि गालावर हाताची पप्पी भेटणार असा विचार आम्ही केला आणि दप्तर घेऊन वर्गाच्या मागच्या भिंती वरून उड्या मारून आम्ही पळ काढला. आता आपले काही खरे नाही.हे कळून चुकले होते.पण काय करणार दुसऱ्या दिवशी शाळेत जाने महत्वाचे होते शाळेत गेलो.मामला शांत होण्या ऐवजी वाढला होता. प्रिन्सिपल सरांकडे सरला ने आमची तक्रार केली होती.काय करावे सुचत नव्हते थोड्या वेळाने वर्गात सरला म्हणजे जिला पेन्सिल लागली ती शेमबडी आणि तिची आई व प्राचार्य सर आले !!!! तशे आमचे पाय लटा लटा करायला लागले आम्ही घाबरलो आता मात्र काही खर नाही हे आम्हाला समजून आल.

प्राचार्य सर ज्यांना आम्ही हिटलर म्हणायचो : कोण कोण होते रे काल त्यांनी उभे राहा !
कस तरी घाबरत घाबरत आम्ही पाच मुले उभे राहिलो.
तसे हिटलर उदगारले काल हिला कोणी पेन्सिल मारली रे !!!
कोणीच काही बोलायला तयार होईना कारण दोस्तीत कुस्ती करणाऱ्यातला एकही गडी नव्हता...!!!!
आता सांगता का ! सर्वाना प्रसाद देवू
तशी सरला म्हणाली सर हा संकेत होता यालाच मी पाहिलं होत सर्व मुली तिच्या पाठीमागे म्हणाल्या हो सर हाच होता .

तसा संकेत घाबरला आणि पटकन बोलून गेला सर पेन्सिल तिला मारण्याचा प्लान नव्हता पेन्सिल पीहू ला मारायची होती पण सरला मधेच आली!
हे ऐकून सर्व पोरी आणि पोर हसायला लागले ..
सर जवळ आले आणि कान पिळत संक्या ला विचारू लागले शाहण्या तू तिला पेन्सिल का? मारणार होतास सांग पटकन !!!! सर सर आं .....!!! आई गं ...!!! Sorry सर परत नाही करणार आं ....!!!!!
सांग का? मारणार होतास तिला पेन्सिल सांगतो का? पिळू अजून तुझा कान !!!! तसा तो घाबरला आणि बोलू लागला.

सर परवा आपला चित्रकलेचा तास चालु असताना मी माझ माझ चित्र काढत माझ्या बेंचवर बसलो होतो. आणि अचानक माझ्या गालावर जोरात ह्या पीहू ने तीच पेन्सिल च थोटूक मला फेकून मारल आणि सर्व मुल मला चिडवायला लागली कि पोरींचा हातचा मार खातोस !!!!!
म्हणून मी नवीन पेन्सिल आणून आपण पण तिला मारू म्हणजे फिटन फाट होईल...!!!! असे मनात आणले होते.
तसे सर्व शिक्षक लोक हसायला लागले आणि सरांचे तोंड पीहू कडे फिरल काय गं !!!!!!! हे खर आहे का ?
तशी पीहू घाबरत खाली मान घालत म्हणाली सर मला त्याला पेन्सिल नव्हती मारायची .....त्याला तर चुकून लागली आणि मग सर्व वर्ग पुन्हा जोर जोरात हसायला लागला कारण सर्वाना माहिती होते,आता गणेश च नाव येणार आणि सर्व वर्ग माझ्याकडे पाहून हसायला लागला.

संपूर्ण वर्गाला शांत करून सरांनी पिहुला विचारले आता तू कोणाला पेन्सिल मारणार होतीस ?
तशी ती निर्लज्ज सदा सुखी पोरगी सरांना बोली सर मला त्याला पेन्सिल मारायचीच नव्हती, तो तर मध्ये आला आणि म्हणून त्याला तो पेन्सिल चा तुकडा लागला. मी तर पेन्सिल चा तुकडा गणेश चे लक्ष माझ्याकडे यावे या साठी त्याच्यावर हळूच फेकला होता.....!!!! पण चूक झाली ह्या संकेत ला लागला मी मात्र शरमेने मान खाली घालून वाचलेली इज्जत सांभाळण्याचा प्रयत्न करत होतो...!!!

सर्व वर्गात असलेल्या मोठ्या माणसांच्या लक्षात आले कि गोष्ट फार मोठी आहे.पोर आता मोठी झाली आहेत...!!! आणि त्यांची मन आता काही वेगळ्या गोष्टींकडे खेचली जाऊ लागली आहेत. या साठी प्रत्येक शाळांना आणि आपल्या सुद्धा शाळेला काही निर्णय घेण्याची गरज आहे. आणि म्हणून आमच्या हिटलर ने धमकावण्याच्या स्वरात सर्वाना ताकित देऊन टाकली कि आज पासून जर कोणी मुलीच्या वाट्याला गेल आणि कोणती मुलगी एखाद्या मुलाच्या वाट्याला गेली तर त्याचा दाखला हातात देऊन घरी पाठवण्यात येईल. पोलीस कार्यवाही करण्यात येईल तुम्ही इथे शाळेत शिकायला येत्ता त्यामुळे शिक्षण घेण हे तुमच काम आहे. समजल...!!! मी मनातच खुश होत होतो ....!!! आज पासून ह्या घुबडीचा त्रास संपला असं मी मनातल्या मनात स्वतःला आनंदाची बातमी देत होतो. एकीकडे का? माहिती का? तिच्या डोळ्यात पाणी दिसत होत बहुदा वर्ग तिच्यावर हसला म्हणून असावं... असो सुटला एकदाचा जीव असं मी स्वतःलाच म्हणतं शांत उभा होतो...!!!

सर्व शिक्षक वर्गातून गेले तसा वर्ग शांत पडला कोणीच कोणाशी बोलत नव्हते.. आणि हळू हळू माझ्या नवीन पेन्सिल फेकून मार आयडियाचे पडसाद दिसायला सुरवात झाले ...मुले मुले वेगळी राहायला लागली आणि अचानक सर्व माँटुरिटी आल्यासारखे सगळे वागायला लागले...खरं तर त्याची गरज होतीच...

गाडी थांबली आणि माझा मुलगा मला म्हणाला पप्प्पा उठा आपण आजोबांकडे पोचलो... तसा मीही माझ्या आनंदमयी आठवणीतून जागा झालो... आणि गाडीतून उतरलो व घरात गेलो...

मित्रानो हा या गोष्टीचा शेवट नाही कारण...जो पर्यंत एंडिंग हैप्पी नाही तब तक ... पिचर अभी बाकी है मेरे दोस्त....

आजच्या मी आणि ती च्या दुसऱ्या भागातून मी आपली रजा घेतो .... लवकरच भेटू नवीन भागात तो पर्यंत... हा भाग आवडल्यास आपल्या मित्रांना आणि प्रिय जणांना शेयर करा... आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि पुढच्या भागात काय होईल हे पाहण्यासाठी टेलिग्राम चानेल ला जोडले जा !
कारण .... अरे भाई
देवाचं असत ते.... 🤣🤣 करायलाच पाहिजे...


आमच्या टेलिग्रामला जोडले जा ! खालील टेलिग्राम नावावर टिक करा 




Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top