पेठ जाहिराती

गोष्ट पेठच्या तळ्याच्या बांधावरची - मी आणि ती भाग - 3

0

गोष्ट पेठच्या तळ्याच्या बांधावरची-मी आणि ती 

भाग - 3


मित्रानो आजचा भाग संपूर्ण वाचा  कारण सुरवातील थोड बोर जरी झाल तरी त्या बोर पणा इतका मोठा ट्वीस्ट आज आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे लेख  संपूर्ण वाचा  व प्रिय जणांना नक्की शेयर करा 
आज वर्गात आलो तसा सरांनी संपूर्ण वर्ग स्वच्छ करण्यास सांगितला आणि सर्व मुलं आणि मुले वर्ग स्वच्छ करू लागले. बेंच हलवण आणि झाडू मारण चालु होतं. अर्थात माझ्या 5 रुपयांच्या नवीन पेन्सिल ची आयडिया बॉम्ब फुटतो तशी फुटलेली व तिचे पडसाद वर्गात दिसत होते. वर्गात या आधी जेव्हा पण वर्ग स्वच्छ करण्यास सांगितले जायचे तेचा मुलं बेंच हलवायची आणि मुली बेंच हलवल्यावर त्या खालील घाण झाडूने झाडून घ्यायच्या आजच चित्र थोडं वेगळं होतं. मुलं मुलांचेच बेंच हलवत होते व स्वतःच बेंच खालील घाण झाडात होते. तस मुली पण एकीला शक्य नसल्याने दोघी मिळून बेंच हलवत होत्या व झाडू मारत होत्या... पेन्सिल च्या घटनेला आज 15 दिवस झाले होते. आणि मी मात्र या घटनेने भलता खुश होतो. कारण तिच्या पासून माझा पिच्छा सुटला होता... ती माझ्याकडे पाहून कधी कधी स्माईल करायची पण मी लगेच तोंड वळवून घ्यायचो. काय सांगू तुम्हाला किती आनंद व्हायचं मला या पोरीनी त्रासच लय दिलता हो!

गोष्ट पेठच्या  तळ्याच्या बांधावरची - मी आणि ती भाग - 3
गोष्ट पेठच्या  तळ्याच्या बांधावरची - मी आणि ती भाग - 3

असे माझे सुखाचे दिवस चाल्ले होते. पण, सुखाचे दिवस फार काळ राहत नाही...हे मी विसरून गेलो होतो. आणि एके दिवशी माझ्या घरात नवीनच लोकांच्या हातात दिसत असणारा मोबाईल Nokia 1300 घेण्यात आला, त्या वेळी फारसा कोणाला वापरता येत नसल्याने अति हुशार असणाऱ्या माझ्याकडेच तो मोबाईल असायचा. मी एके दिवशी ठरवल कि मोबाईल वर्गात घेऊन जायचा आणि पोरांवर भास मारायचा. ठरल्या प्रमाणे मी मोबाईल घेऊन वर्गात गेलो आणि वर्गात फक्त आम्हीच आहोत हे लक्षात घेऊन मी सर्वाना मोठ्या दिमाखाने मोबाईल दाखवू लागलो... आणि ओह्ह्हणो....! तिने कुणास ठाऊक कसा पण माझ्याकडे मोबाईल आहे हे पाहिलं.... वर्गात कोणी नसताना दुपारच्या सुट्टीत माझ्या जवळ आली आणि माझा मोबाईल नंबर मागू लागली.... तसा मी तुला मोबाईल नंबर देणार नाही असे स्पष्ट सांगितले....असं बोलताच ती शहाणी मला म्हणते.... सांगू का तुझं नाव तू मोबाईल वर्गात आणला आहेस असं....सरांना...मग मोबाईल पण जप्त होईल आणि पिटाई केली जाईल ती वेगळी....हे ऐकताच
मी घाबरलो आणि म्हणालो नको!!! नको!!!! एक तर घरच्याना माहिती नाही.... लय मारतील मला ... आणि घाबरून नंबर देऊन टाकला.... आणि काय सांगू मित्रानो... गेमच झाला हो....!!!!
 
तिचा त्रास पुन्हा चालू झाला त्या वेळी मला चाटीग करता येत नव्हती. म्हणून ती सारखी फोन करायची माझ्या घरातील दुसऱ्या कोणी फोन उचला कि कट करयची...... आणि मी उचला कि बोलायची...तशी हुशार होती पण 1 मिनिटाला 1 रुपया द्यावा लागायचा म्हणून फार फार तर २ मिनिट बोलायची पण तिच्या साठी मला त्रास देन सोप झाल होत.फोन केला का धमकी दत्त मंदिरात १० मिनिटात आला नाहीस तर मी घरी येईल !!!!!!
आणि मी बिचारा तिला घाबरून १० मिनिटात असेल तसा हजर व्हायचो.आता मला हसू येत त्या गोष्टीच कि गेलो नसतो तर खरच आली असती का ती ? छे हो कसली येते ती स्वताच घाबरगुंडी होती. पण मला मात्र फार धमकावल तिने आता शाळेमागच्या सप्तशृंगी मंदिराच्या पाठीमागच्या मैदानात आणि पोलीस कोलोनी मधील दत्त मंदिर उद्यानात ती मला बोलवत असे.आणि मीही चुपचाप जाऊन भेटायचो.

आमची आता खूप गट्टी जमली होती.तिने जरी फोन केला नाही तरी मी दत्त मंदिरात देवाचे दर्शन करायला जायचोच आणि ती ही मला फोन करून न येत्ता डायरेक्ट दर्शनाला हजर राहायची.
आम्ही रोज भेटायचो रोज बोलायचो पण अजूनही मी एकही वेळा तिचा हात माझ्या हातात घेण्याचा प्रयत्न केला नव्हता किंवा तिला खेटून बसण्याची हिम्मत देखील केली नव्हती.असा प्रयत्न तिने बऱ्याच वेळा केला होता हि वेगळी गोष्ट आहे. पण मी मात्र तिला तसा रीस्पोंस कधीच दिला नाही. आता तुम्ही मला आईचे शब्द पाळणारा म्हणा किंवा घाबरगुंड म्हणा पण मी असाच होतो.

आज मला शाळेला यायला उशीर झाला पहिला तास उलटून गेला होता. दुसऱ्या तासाचे शिक्षक वर्गावर आले नव्हते याचा फायदा घेत मी पटकन वर्गात शिरलो आणि माझ्या बेंच वर जाऊन बसलो बुधवारचा दिवस असल्याने आज रंगीत कपडे घालण्याचा दिवस होता.सर्व विद्यार्थी रंगीत कपडे घालून आले होते. त्यामुळे मी इतक नोटीस केला नाही.आता वर्गात मुले मुली मध्ये असणारे भांडण पाहत कोणताच मुलगा कोणत्या मुलीकडे पाहत नव्हता म्हणून मीही पिहुकडे लक्ष दिले नाही. तसही शाळा सुटल्यावर सप्तशृंगी मंदिरात आम्ही भेटणारच होतो. दुपारची सुट्टी झाली सर्व वर्गातून जेवणासाठी बाहेर निघाले मी आणि पीहू शेवट होतो.तसा आज आपण भेटायचं आहे. हे मला पिहुनी इशाऱ्याने सांगितला आणि तीने इशाऱ्याने मी कशी दिसतेय हे हि विचारले मी हि हाताने च खूप सुंदर असे उत्तर दिले आणि जेवायला आप आपल्या वाटेला जेवायला गेलो.जेवण करून आल्यावर पुन्हा तास सुरु झाले आणि त्या तासांमध्ये मी पिहुला विसरून गेलो. शाळा सुटली तसा मी माझ्या मित्रान बरोबर उड्या मारत घरी निघून गेलो. आणि दुसऱ्या दिवशी नेहमी प्रमाणे शाळेला आलो आज मी थोडा लवकर आलेलो होतो.पण रोज लवकर येणारी पीहू मला कुठे दिसत नव्हती. वर्ग भरला पण पीहू काय आली नाही. सरांनी हजेरी घेण्यास सुरवात केली व व हजेरी चालू असताना ...पिहुचे आई वडील व आमचे प्राचार्य आले.

प्राचार्यांनी बोलायला सुरवात केली कि आपल्या वर्गातील पीहू नावाची मुलगी काल शाळा सुटल्या पासून गायब आहे. ती घरी पोचलेली नाही. हे ........ऐकून माझ्या डोक्यात सुन्न झाल....!!! मला टेन्शन आला कि हि कुठे गेली असेल वैगेरे वैगेरे प्रश्न मला भेडसावत होते.
प्राचार्यांनी पुन्हा बोलायला सुरवात केली.....जर कुणी तिला कुणासोबत जाताना किंवा कुणी तिला बळजबरीने नेताना पाहिलं असेल तर त्याने समोर येवून त्याची माहिती द्यावी. प तिच्या कोणत्याच मैत्रिणीला कुठलीच माहिती नव्हती.

काय झाल असेल तिच? कुठे गेली असेल ती ? कोणी तिच्या सोबत काही वाईट तर केल नसेल न ? कोणी तिला मारून तर टाकले नसेल न असे एक न अनेक प्रश्न माझ्या मनात चालू होते. आणि यातच माझा पूर्ण दिवस गेला मी जेवणही केले नव्हते याच्याच विचार करत करत शाळा देखील सुटली. मी याच विचारात घरी गेल आणि हातपाय धुवून चहा घेतला आणि दत्त मंदिरात जायला निघालो. तिथ गेल्यावर पीहू कायम हजर असायची पण आज ती नव्हती, संध्याकाळचे ६ वाजले होते ती बसायची त्या पायरीकडे शेवटच पाहून मी निघणार तेवड्यात तिने शेवटच्या वेळी केलेल्या खुणा मला आठवल्या आणि मी सप्तशृंगी मंदिराच्या दिशेन पळायला लागलो. 
बाकी वाट पाहणं भावनो  करतो लवकरच उपलब्ध 

सगळी स्टोरी एकदाच वाचायची अस ठरवलंय का ? अरे लिहू तर द्या  इतके Msg इतके call तुमच्या सोबत बोलत बसू कि पुढची स्टोरी लिहू ...

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top