तालुक्यातील दोन अद्भुत आत्मे - Two Soules Part -2
गाडी 1:16 मिनिटात.. सिव्हिल ला पोचली... पेशंट ला... सर्व ट्रीटमेंट चालू झाली..... अंगावर नळ्या सलाईन... ऑक्सिजन सगळं चढवून झालं... अचानक डोळे उघडले.... सिव्हिल समोरील झाडाच्या बरुंडा वर... अंकुश बसला होता.. आणि त्याला सगळं दिसत होता... सिव्हिल मधील... लोकांची धावपळ... रडा रड.. चालू आहे.. कोणी बर होऊन जात आहे तर कोणी.. नवीन च दवाखान्यात येत आहे... सगळ्या धावपळीत...
त्याला त्याचा मित्रा धावतच येताना दिसला... तो धावत आहे...हे पाहून... अंकुश देखील त्याच्या पाठो पाठ... धावत सुटला... राम अरे काय झालं मला सांग अरे ये सांगा ना का पळत आहेस... पळता पळता.. तो एका पेशंट च्या पलंगा जवळ जाऊन थांबला... राम त्याच्या वडिलांना विचारू लागला... की आता तो कसा आहे... तशे त्याचे वडील बोलले तो कोमात गेला आहे... तसा पेशंट कोण आहे...
हे पलंगावर न पाहता तो रामला बोलू लागला हा तुक्या इथं का आला आहे... याला जायाला लाव माझ्या... डोक्यात जायला नको लावू.... राम याला जायला सांग... तसा राम ने त्याला ऐकल्या आणि न ऐकल्याच केला आणि तुकाराम ला म्हणजेच अंकु्श च्या वडिलांना राम बोला होईल सगळं नीट... तुम्ही टेन्शन नका घेऊ... मी आहे तुमच्या सोबत...
तसा अंकुश रामला विचारू लागला... की... टू आहेस म्हणजे... कोणाला काय झालं ये राम्या... असं बोलतांन करता त्याच लक्ष... त्या पलंगावरील... माणसांवर गेलं आणि... त्याला लक्षात... आलं की... इथं ऍडमिट केलेला पेशंट दुसरा तिसरा कोणी नसून... तो स्वतः म्हणजे अंकुश च आहे...आणि तो खाली बसून पडला... म्हणजे मी मेलो...? की काय ? आणि त्याला सगळं आठवयला लागला त्याने इघ येण्या आधी काय कांड केला हे त्याला आठवू लागला...
अंकुश चा बाप रडत होता कारण त्याला त्याच्या पलीकडे कोणीच नव्हते... राम सुद्धा खूप दुःखी होता... इतक्यात... वोर्डबॉय आला आणि म्हणाला डॉक्टर तुम्हाला बोलावत आहेत...



