गोष्ट पेठच्या तळ्याच्या बांधावरची-मी आणि ती भाग - 4
भाग 1-2-3 वाचले नसतील तर हा भाग वाचण्या आधी आधीचे भाग वाचण्याचा सल्ला मी आपल्याला देईल कारण त्या शिवाय आपल्याला ही गोष्ट समजणार नाही...
तर मला अचानक पिहू ने केलेले शेवटचे इशारे आठवले आणि माझ्या अंगावर शहारे आले आणि मी.. सप्तश्रुंगी मंदिराच्या दिशेने पळू लागलो कारण ही येडी... मला बोली होती.. की मी.. तुला तिथं भेटेल...कसा बसा धापा टाकत टाकत मी मंदिरा जवळ पोचलो..
सर्व बाजूला पाहिल्यावर आणि थकून शांत उभा राहिल्यावर
मंदिराच्या मागच्या बाजूला एक साबरीचे झाड होते आणि खाली शाळेचे ग्राऊंड आणि त्याच झाडाच्या शेजारी असले एक झाड तोडून टाकण्यात आले होते आणि त्याच्या भल्या मोठ्या खोडाच्या पाठीमागे मला एक सफेद रंगाची प्रतिकृती दिसली... तसा मी घाबरलो... म्हटलं हडळ... च आहे... की काय... पण नंतर लक्षात आलं... की मी मंदिरात उभा आहे.. इकडे असलं काही होत येत नाही...
तरीही... संपूर्ण घाबरलेल्या अवस्थेत मी राम.. राम,.. राम.... असं म्हणत... पुढे गेलो... तिला... माझी चाहूल लागली असावी तिने मागे वळून पहिले.... तसा मी निश्चिन्त झालो... आणि पटकन तिच्या... जवळ गेलो...
पांढरा चुडीदार घातलेली... लाल बांगड्या... आणि विचारलेले केस संपूर्ण विस्कळीत झाले होते... डोळ्याला लावलेला काजळ असुळा सोबत वाहून खाली आला होता...
तिला पाहिलं आणि मी उदगारलो...
कुठे आहेस कुठे शहाणे
तुझे आई वडील वर्गात आले होते ते सर्व ठिकाणी तुला शोधात आहेत... आणि तू इकडं काय करते...
तसे तिच्या डोळ्यात पाणी आले... आणि बोली तू मला भेटायला... काल का आला नाहीस... मी इथे... तुला बोलावलं होत ना...तू आला नाहीस...मग मी इथेच तुझी वाट पाहत बसले...
हे ऐकताच... माझा राग अनावर झाला आणि आफही दोन बुक्या... चांगल्या दिल्या धबा धब... तशी ती जोरात रडू लागली...
मी म्हणाल शांत बस नय आलो तर वर्गात... भेटलो असतो ना आज... काय मूर्ख पणा आहे... हा... तशी ती बोली
अरे पण काल मजा वाढदिवस होता... आणि मला तूझ्या कडून केक भरवून घ्यायचा होता...
आणि लागली रडायला....
तुम्हाला सांगतो मित्रानो... या पोरी म्हणजे गुडघ्यात मेंदू... कशी बशी गप केली... तिनेच आणलेला पर्वाचा केक तिजलाच खाऊ घातला.. अजून दोन बुक्या मारल्या... आणि बोलो आताच्या आता घरी जा... पण तिचा अवतार पाहता... कोनी पण म्हणेल इचा सोबत काहीतरी झालं आहे...मग एक आयडिया केली...
तिला म्हणल तू इथं झोपून राहा... मी आलो... आणि मी पळत पळत तिच्या घरी गेलो धापा टाकत टाकत माझ्या न झालेल्या सासऱ्याला सांगू लागलो की मी मंदिरात गेलो होतो तिथं एका कोपऱ्याला... ती पडलेली दिसली तशी तिच्या बापाने त्यांची... ओमणी काढली आणि झालो मी पुन्हा एकदा hero... तिला वाचवायला घेऊन आलो तिच्या बापाला... तिच्या... आईने तर माझा मुका घ्यायचीच राहिली होती...
आम्ही तिच्या जवळ गेलो तिला उठवण्याचा प्रयत्न केला आणि... तीला शुद्ध आली... आणि सगळ्याने प्रश्न चालू झाले...
म्हटलं आता ही नाटकी पोरगी... मै कहा हू वाला डायलॉग मारते की काय... पण बोली की मी दर्शनाला आली आणि मला चक्कर येऊन मी इथं पडले...हे ऐकताच... गाडी घरी जात होती... तर स्टेरिंग वळलं आणि सरकारी दवाखान्यच्या दिशेने गाडी चालू लागली...
तिथं नेल्यावर... डॉकटर ने चेकअप केला आणि बोला इंजेक्शन देतो... तसा... मला इतका आनंद झाला... काय सांगू... कारण आजारी असताना... इंजेक्शन घेणं वेगळं आणि नाटक करत असताना घेन वेगळं... त्यात... ही इंजेक्शन ला घाबरणारी...तिला नाही सुद्धा सांगता आलं नाही डॉक्टर आला आणि... झटकन देऊन गेला मला हसू अवरेना... मम्हणून मी... तोंडावर हात ठेवून बाहेर निघालो आणि जाम हसलो... जाम...
एक मुलगी काहीच कळत नाही त्या वयात.. तिच्या वाढदिवसाच्या.. दिवशी... माझ्यासाठी मंदिरात येते आणि मी आलो नाही म्हणून हट्टला पेटते आणि रात्र भर... न जेवता... न पाणी पिता.. न घाबरता.. तिथे बसून राहते...हे आता... समजतंय पण तेव्हा कुठे समजत होत.. तेव्हा मी 15 वर्षचा मुलगाच तर होतो..काही समजतं नव्हतं... प्रेम नावाच्या गोष्टी अशाच असतात... जोवर मिळत असतात... तोवर कळत नसतात आणि जेव्हा कळायला लागतात.. तेव्हा हातातून निघून गेल्ल्या असतात...
या भागाचा शेवट करतो कारण हा किसा इथेच संपला पण मित्रानो गोष्ट संपलेली नाही... बराच काही आहे जे सांगायचं आहे.... आजचा किसा संपवण्या पूर्वी... तिच्या आणि माझ्या आयुष्यावरील एक छानसी कविता...
*गोष्ट पेठच्या तळ्याच्या बांधावरची - मी आणि ती*
पेठच्या तळ्याच्या शांत पाण्यात,
चांदण्यांनी स्वप्नांचं चित्र काढलं,
तिथे मी, आणि ती, दोन जीव,
प्रेमाच्या गुलाबांनी रंगलेलं.
शांत होता तळं, आणि मनही आमचं,
दोघांनी एकमेकांच्या नजरेत पाहिलं,
ती हळूच म्हणाली, "हे क्षण कायमचे ठेवू,
या प्रेमाला कधीच नाही विसरू."
तिच्या डोळ्यांत होतं सागरसारखं गहिरं,
माझं मन त्या गहिराईत बुडालं,
तळ्याच्या किनाऱ्यावरची ती हळवी हवा,
माझ्या हृदयाच्या तारांत तिने गुंफलं.
पण आलं एक दिवस, जणू काळचं सावट,
वाटेवरची फुलं झाली करडी,
ती निघून गेली दूर, सोडून तळं,
आणि माझ्या हृदयात रुतली ती विरहाची लाट.
तळं तसंच आहे, शांत आणि खामोश,
फक्त त्या पाण्यात आता प्रतिबिंब तिचं नाही,
माझं प्रेम तिथं अजूनही जिवंत आहे,
पण ती आता माझ्या आसपास नाही.
तिच्या आठवणींचं ओझं मला सोबतं देतं,
पेठच्या तळ्याच्या किनाऱ्यावर आता मी एकटा आहे,
तिचं स्मरणं करीत, त्या शांत पाण्यात,
माझ्या हृदयातलं प्रेम मात्र अजरामर आहे.



