करंजाळी बाजारातील पोलीस स्टेशन च्या पाठीमागचा बाबा चमत्कार...
शुक्रवार म्हणजे करंजाळी च्या बाजाराचा दिवस आणि सुमारे दुपारचे १२ वाजेच्या दरम्यान माझ्या नर्स असणाऱ्या मामीचा फोन आला कि जगू जो भायगाव चा रहिवाशी आणि माझ्या मावशीचा मुलगा आहे त्याची तबेत खूप बिघडली आहे.आणि त्याला योगेश डॉक्टरांच्या दवाखान्यात घेऊन गेले आहेत.तरी तू आणि गोकुळ म्हणजे माझा मामे भाऊ म्हणजेच नर्स मामीचा मुलगा अशे दोघे आपली आपली मोठी गाडी घेऊन या कदाचित नाशिक ला दवाखान्यात नेण्याची गरज पडू शकते.
तसा मी गोकुळ जवळ जाऊन त्याला सांगितल आणि योगेश डॉक्टर च्या दवाखान्यात गेलो ...तिथ जाईपर्यंत डॉक्टरांनी त्याचं काम चोख बजावत त्याच्या वेदना कमी केल्या त्याला पाहून योगेश डॉक्टरांच्या दवाखान्यातील मागच्या बाजूच्या दाराने मी मागच्या बाजूस बाहेर निघालो आणि असाच मोबाईल काढून टाईमपास करत उभा राहिलो यातच अचानक कुणाच्या तरी रडण्याचा आवाज आला आणि मी त्या दिशेने पाहिलं तर शेजारी जे पोलीस स्टेशन आहे.
त्याच्या मागच्या बाजूस २ पुरुष आणि १ स्त्री बसलेली होती पाहण्यावरून दोघ नवराबायको आणि एक म्हातारा माणूस होता .बाई त्याला मुल न होण्याची गोष्ट सांगत होती आणि रडत होती कदाचित तील यावरून सासू खूप त्रास करत असावी अस तिच्या बोलण्यावरून वाटल.
तसा तीच सगळ ऐकल्यावर त्या म्हाताऱ्या माणसाने खिशातून कसल तरी दगड काढले आणि कशाची तरी मुळी काढली त्याने जे केले ते मला स्पष्ट दिसत होते कारण मी जेमतेम ४ फुट अंतरावर होतो त्याने ते सफेद बारीक दगड मुठीत घेतले आणि तोंडा जवळ घेऊन त्याचा मंत्र पुट पुटु लागला आणि अलगत जमिनीवर टाकले आणि स्वताशीच काहीतरी बोलत त्याने कसली तरी गणना केली आणि त्या स्त्री ला एखाद्यानि बाधा केली आहे असे बोलू लागला.
ती गोष्ट सिद्ध करण्यासाठी त्याने जवळची मुळी घेतली आणि २ बारीक काड्या घेऊन मंत्राने त्या काड्या तो त्या मुळीला चिटकवून दाखवू लागला त्याच अस म्हण होत कि काहीतरी बाधा आहे.म्हणून ह्या काड्या त्याच्या हातातील मुळीला चीटकत आहेत.
त्याचा
बंदोबस्त करावा लागेल असे त्याने सांगितले आणि ते करण्यासाठी मी तुम्हाला जे
सांगेल ते कराव लागेल आणि त्या साठी खर्च होईल असेही सांगितले .या घटने नंतर मला
काय ती माणसे परत दिसली नाही पण तुम्हाला तुमच्या समस्यांचे निवारण करून घ्यायचे
असल्यास तुम्ही या बाबा चमत्कार ला भेटू शकता कदाचित तो अजूनही तिथ येत असेल
बाजाराच्या दिवशी
तसेच मी स्वत या भोंदू लोकांपासून लांब राहतो त्यामुळे मी
इतरांना सुधा अशा लोकांकडे न जाण्याचा सल्ला देईल हि घटना पूर्ण पणे खरी असून
माझ्या स्वतः सोबत घडलेली आहे.


